आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गनिमी काव्याने आणले सरकार, ‘खंजीर खुपसण्याची भाषा संजय राऊतांना शाेभत नाही’ : चंद्रकांत पाटील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘जनतेने भाजप-शिवसेना आघाडीला स्पष्ट जनादेश दिला असताना शिवसेनेने पहिल्याच पत्रकार परिषदेत आमचे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले. सेना नेते आम्हाला सोडून पहिल्यापासूनच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करत होते. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला. तसंच सावरकरांना भारतरत्न देण्याच्या विषयही त्यांनी सोडला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी आम्हाला शिवाजी महाराजांनी शिकवल्याप्रमाणे गनिमी कावा करत सरकार स्थापन करावे लागले,’  अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. ‘शिवसेना खासदार संंजय राऊत यांच्या तोंडी पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा शोभत नाही. त्यांनी शिवसेनेची वाट लावली आहे. आता त्यांनी तोंड बंद करावे.  सत्तेत असताना आम्ही वेळाेवेळी मातोश्रीचा मान ठेवला होता. बाळासाहेबांविषयी आम्हाला आजही आदर आहे. पण आता उद्धव ठाकरेंना चर्चेसाठी शरद पवारांच्या घरी सिल्व्हर ओकवर जावं लागलं. इतकेच नव्हे तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये जावे लागले,’ असेही पाटील म्हणाले.

आमच्याकडे १७० वर आमदारांचा पाठिंबा; गिरीश महाजनांचा दावा
भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले  की, अजित पवार हे राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटाचे नेते आहेत. त्यांनी राज्यपालांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिलेले आहे. आमच्याकडे १७० वर आमदारांचा पाठिंबा आहे. आम्ही राज्याला पूर्ण ५ वर्षांसाठी स्थिर सरकार देणार आहेत. शिवसेनेचाच मुख्यमंत्री हाेईल, असे वारंवार सांगणाऱ्या संजय राऊत यांच्या वागण्याला शिवसेनेतील आमदारच वैतागले असल्याचेही महाजन म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...