आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने ओबीसी नेतृत्त्वाला मोठे केले, प्रकाश शेंडगे यांना भाजपबद्दल बोलण्याचा अधिकार नाही - चंद्रशेखर बावनकुळे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पंकजा मुंडे ओबीसी नेत्या असल्यामुळे त्यांचे खच्चीकरण केले आहे असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केले होते. भाजपने ओबीसी नेतृत्त्वाला मोठे केले आहे. भाजपच्या नेत्यांबाबत बोलण्याचा प्रकाश शेंडगे यांचा अधिकार नाही असे म्हणत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेंडगे यांचा समाचार घेतला. 


पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रकाश शेंडगे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा पक्ष सोडला, यामुळे त्यांना भाजपबाबत बोलण्याचा अधिकार नाही. पक्षाने मोठे केले याचा नेत्यांना विसर पडायला नको असे ते म्हणाले. तसेच भाजपचा कुठलाही आमदार पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.