आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नेत्याने बळजबरीने महिलेचे चुंबन घेतले..लैंगिक अत्याचाराचाही प्रयत्न, अश्लील फोटोही पाठविले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंड- भाजपचे उत्तराखंडाचे संघटन महासचिव संजय कुमार यांना पक्षाने आठवड्याभरापूर्वी तडकाफडकी निलंबित केले. त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. तक्रारदार महिलेने सांगितले की, संजय कुमार यांनी तिला दोनदा बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न करत तिला पकडण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर तिच्या मोबाइलवर अश्लील फोटोही पाठविले.

 

भाजप कार्यालयातच लैंगिक अत्याचार...

पीडित महिला भाजपची कार्यकर्ता असून ती सध्या देहरादूनला राहते. आधी ती दिल्लीत राहत होती. संजय कुमार यांनी तिच्यावर अनेकदा भाजप कार्यालयातच लैंग‍िक अत्याचारही केल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

 

फोन हिसकावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

> पीडितेने सांगितले की, संजय कुमार यांच्या कार्यकर्त्यांनी तिचा फोन हिसकावून घेत पुरावे नष्ट करण्‍याचा प्रयत्न होता. फोनमध्ये संजय कुमार आणि पीडितेच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप होत्या. या प्रकरणी पीडितेने अनेकदा पोलिसांत तक्रार‍ी दिल्या. परंंतु त्याची कोणीही दखल घेतली नाही. या संदर्भात संजय कुमार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी संजय कुमार यांना निलंबित केल्याचे जाहीर केले आहे.

 

पीडितेला पाठवायचा अश्लील फोटो

 पीडित महिला फेब्रुवारीमध्ये पक्षाला आजीवन सहयोग निधीच्या योजनेतून मिळणाऱ्या निधीच्या चेकची डेटा एंन्ट्रीचे काम करत होती. यादरम्यान तिची आणि संजय कुमार यांनी ओळख झाली. पीडितेच्या मोबाइलवर संजय कुमार यांनी अश्लील फोटो पाठवत होते. एवढेच नाही तरी बळजबरीने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.

बातम्या आणखी आहेत...