Home | Maharashtra | Mumbai | BJP Leader Sanji Varma Says Pedestrians are responsible for mumbai foot over bridge collapse

मुंबईतील पूल दुर्घटनेला पादचारीच जबाबदार, भाजपच्या महिला नेत्याने तोडले अकलेचे तारे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 15, 2019, 04:24 PM IST

संजू वर्मा यांच्या बेताल वक्तव्यावर सोशल मीडियावर कडाडून टीका होत आहे.

  • BJP Leader Sanji Varma Says Pedestrians are responsible for mumbai foot over bridge collapse

    मुंबई- मुंबईच्या सीएसएमटीजवळ पादचारी पुलाचा निम्यापेक्षाजास्त स्लॅब कोसळून भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे. एकीकडे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी या घटनेचे दु:ख व्यक्त केले असल्याने दुसरीकडे, भाजपच्या एका महिला नेत्याने अकलेचे तारे तोडले आहे. पूल दुर्घटनेला पादचारीच जबाबदार असल्याचे भाजपच्या नेत्या संजू वर्मा यांनी केले आहे.

    संजू वर्मा या 'टाइम्स नाऊ'च्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. संजू वर्मा यांनी सुरुवातीला हे नैसर्गिक संकट असल्याचे सांगितले. नंतर या दुर्घटनेशी सरकारचा काहीही संबंध नसल्याचे सांगत त्यांना अंग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर त्यांनी दुर्घटनेला पादचारीच जबाबदार असल्याचे संतापजनक वक्तव्य केले. संजू वर्मा यांच्या बेताल वक्तव्यावर सोशल मीडियावर कडाडून टीका होत आहे.

    दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पूल दुर्घटनेची प्राथमिक जबाबदारी कुणाची आहे, हे निश्चित करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

Trending