आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचानक एका दुकानावर थांबला केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा ताफा, तिथे खाल्ले ब्रेड पकोडे आणि पिला चहा, कौतुक करताना स्मृती म्हणाल्या- अमेठीमध्ये दुकान का उघडत नाहीत, दुकानदारानेही लगेच दिले उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वाराणसी(उत्तरप्रदेश)- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सध्या उत्तर प्रदेशमध्ये प्रचार करत आहेत. यासाठीच मंगळवारी त्या वाराणसीवरून भदोहीमधील एका सभेला संबोधित करण्यासाठी जात होत्या. त्या सभेवरून परत येत असताना एअरपोर्टच्या बाहेर त्यांच्या ताफा एका चहाच्या दुकानात थंबला. दुकानावर आधीपासून बसलेल्या बीजेपी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. या दुकानात स्मृती यांनी ब्रेड पकोडा खाल्ला आणि चहा पिली. ब्रेड पकोड त्यांना खूप आवडला, यावर त्यांनी त्या दुकानदाराला अमेठीमध्ये दुकान चालवण्याचा सल्ला दिला. त्यावर दुकानदाराने त्यांना मजेशीर उत्तर दिले.


दुकानदार म्हणाला- हेच खूप आहे
- दुकानदाराला अमेठीमध्ये येण्याचा सल्ला स्मृती यांनी दिला. त्या म्हणाल्या चहा आणि पकोडा खूप चांगला झाला आहे, अमेठीला येऊन तिथे दुकान सुरू कर. यावर तो म्हणाला 'चहा बनवणे गुजरातमधून शिकलो आहे. वाराणसीत याला विकत आहे, हेच खूप आहे.' यावर तिथे उपस्थित लोक हसू लागले. 

बातम्या आणखी आहेत...