आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नेते डॉ. सैयद जफर इस्लाम यांनी केली भाजप-सिंधिया डील, पाच महिन्यांपासून या मिशनवर काम करत होते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीय राजकारणात येण्यापूर्वी जफर इस्लाम ड्यूश बँकेचे एमडी होते

नवी दिल्ली- शेवटी त्या व्यक्तीचे नाव समोर आलेच, ज्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया आणि भाजपमध्ये 'डील' केली. ज्यातिरादित्य यांना भाजपमध्ये घेण्याच्या मिशनमागे होते भाजप प्रवक्ते आणि माजी बँकर जफर इस्लाम. या गोष्टीची पुष्टी तेव्हा झाली, जेव्हा स्वतः जफर इस्लाम ज्योतिरादित्य यांना भेटण्यासाठी त्यांच्या दिल्लीमधील आनंद लोक निवासस्थानी गेले. सिंधिया यांच्यासोबत 35 मिनीटांची चर्चा झाल्यानंतर दुपारी 2 वाजून 10 मिनीटांनी स्वतः जफर इस्लाम त्यांना त्यांच्याच गाडीत घेऊन भाजप कार्यालयाकडे रवाना झाले. 

कोण आहेत जफर इस्लाम ?


जफर इस्लाम यांचे पूर्ण नाव डॉ. सैयद जफर इस्लाम आहे. त्यांना भाजपचा सुधारणावादी मुस्लीम नेता म्हणून ओळखले जाते. भाजपमधील त्यांचे करिअर फक्त 7 वर्षांचे आहे, पण या काही वर्षांमध्ये त्यांनी मोठे पद सांभाळले आहे. भाजपचे अधिकृत प्रवक्ते म्हणून जफर इस्लाम मीडियासमोर भाजपची बाजू मांडतात. भारतीय राजकारणात येण्यापूर्वी जफर इस्लाम ड्यूश बँकेचे एमडी होते. सध्या ते भाजपचे प्रवक्ते असण्यासोबतच एअर इंडिया बोर्डामध्ये संचालकदेखील आहेत.

कशी झाली डील ?


जफर आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांची जुनी ओळख आहे. त्यांच्या मैत्रिची सुरूवात जफर यांच्या बँकिंग करिअरदरम्यान झाली. तेव्हा सिंधिया यूपीए सरकारमध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्री होते. परंतू, मध्यप्रदेशच्या राजकारणात आल्यानंतर सिंधिया जेव्हा-जेव्हा दिल्लीत यायचे, तेव्हा जफर त्यांची भेट घ्यायचे. मागील पाच महिन्यांपासून जफर ज्योतिरादित्य यांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या काही दिवसांमध्ये दोघांत पाच मीटिंग्स झाल्या. स्वतः सिंधिया यांनी भाजपमध्ये येण्याचे सांगितले होते.

भाजपने यामुळे जफर यांच्यावर दिली मिशनची जबाबदारी


जफर इस्लाम 2013 मध्ये भाजपात आले. ड्यूश बँकेचे मॅनेजिंग डायरेक्‍टरम्हणून काम केलेले जफर इस्‍लाम मोदींच्या राजकारणावरुन प्रभावित झाले. असे म्हणले जाते की, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जफर इस्लाम यांचे चांगले संबंध आहेत, तसेच, गृहमंत्री अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्याही ते गुड लुक्समध्ये आहेत. यामुळेच मृदुभाषी आणि चांगल्या व्यक्तीत्वाचे धनी जफर इस्लाम यांना बीजेपी हायकमानने इतके मोठे ऑपरेशन चालवण्याची जबाबदारी दिली.

'मोदींनी भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले'

सैयद जफर इस्‍लाम यांनी आपल्या एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते की, 'मी फायनांस सेक्टरमध्ये खूप काम केले आहे. 2013 मध्ये मी राजकारणात येण्याचे ठरवले, तेव्हा मी ड्यूश बँकचा एमडी होतो. मी काँग्रेसच्या नेत्यांना भेटलो, पण त्यांच्या सत्तेची लालसा असल्याचे मला आढळले. तेव्हा योगायोगाने माजी नरेंद्र मोदींशी ओळख झाली. तेव्हा त्यांनी मला राष्ट्रनिर्माणासाठी भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले.'
 

बातम्या आणखी आहेत...