आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Leaders Have Differences : 'Action Should Taken On SP': Naqvi, 'There Is Nothing Wrong With The Statement': Maurya

'एसपींवर कारवाई व्हावी' : नक्वी, 'वक्तव्यात काही चूक नाही' : मौर्य, तर मेरठ पोलिस अधीक्षकांच्या वक्तव्यावर स्वतंत्र भूमिका

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
सीएएच्या विराेधात दिल्लीत मुलीही रस्त्यावर : छायाचित्र जामिया मिलिया विद्यापीठातील आहे. येथे रविवारी लहान मुलींनी डाेळ्यांवर पट्टी बांधून दिल्ली पाेलिसांच्या विराेधात निदर्शने केली. - Divya Marathi
सीएएच्या विराेधात दिल्लीत मुलीही रस्त्यावर : छायाचित्र जामिया मिलिया विद्यापीठातील आहे. येथे रविवारी लहान मुलींनी डाेळ्यांवर पट्टी बांधून दिल्ली पाेलिसांच्या विराेधात निदर्शने केली.

लखनऊ/ नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विराेधातील हिंसाचारादरम्यान मेरठच्या पाेलिस अधीक्षकांंनी निदर्शकांना उद्देशून 'पाकिस्तानला चालते व्हा'या केलेल्या वक्तव्यावर भाजपमध्ये मतभेद दिसून आले. मेरठ एसपींचे वक्तव्य मुस्लिमांसाठी नव्हते. त्यात गैर काहीही नाही. दुसरीकडे केंद्रीय मुख्तार अब्बास नक्वी यांनी एसपींच्या वक्तव्याबाबतचा व्हिडिआे सत्य असेल तर त्याचा निषेध करायला हवा. त्यांच्या विराेधात तत्काळ कारवाई व्हायला हवी. तिकडे बसपा प्रमुख मायावती यांनी एसपींच्या धमकीला दुर्दैवी असल्याचे सांगून चाैकशी करावी. त्यात दाेषी आढळून आल्यास कारवाईची मागणी त्यांनी केली.

काय आहे प्रकरण : २० डिसेंबरला मेरठमध्ये हिंसाचाराचा व्हिडिआे समाेर आला हाेता. त्यात मेरठ शहराचे पाेलिस अधीक्षक अखिलेश नारायण निदर्शकांना तुम्ही पाकिस्तान जिंदाबादच्या घाेषणा देत आहात. भारताची घृणा करता. दगडफेक करता. तुम्ही पाकिस्तानला चालते व्हायला हवे, असे बाेलताना दिसतात.

कारवाई : बसपाने सीएएच्या मदतीने आमदाराला काढले

बसपा प्रमुख मायावती यांनी सीएएचे समर्थन करणाऱ्या आमदार रमाबाई यांना निलंबित केले आहे. रमाबाई यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या कार्यक्रमात पाठिंबा दिला हाेता. मायावतींचा सीएएला विराेध आहे.

दंड : प्रियंका गांधींच्या स्कूटीचे चालान कटले

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी शनिवारी लखनऊमध्ये स्कूटीवर बसून जात हाेत्या. त्या दरम्यान राजस्थानचे काँग्रेस आमदार धीरज गुर्जर स्कूटी चालवत हाेते. हेल्मेट नसल्याने त्यांना ६ हजार ३०० रुपयांचा दंड भरावा लागला.

विराेध : मी एनपीआरचा अर्ज भरणार नाही : अखिलेश

सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, भाजपचे ३०० आमदार मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांच्यावर नाराज आहेत. माझ्याकडे सरकारी कर्मचारी एनपीआरची माहिती घेण्यासाठी येतील. तेव्हा मी त्यांना माहिती देणार नाही.

खेलाे इंडिया'च्या उद्घाटनास माेदी आल्यास विराेध करू : आसू

'खेलाे इंडिया'च्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी आसाममध्ये येतील. तेव्हा त्यांचा निषेध केला जाईल, असे सीएएच्या विराेधात आसाम स्टुडंट्स युनियनने (आसू) स्पष्ट केले. रविवारी चेन्नईत सीएएच्या विराेधात रस्त्यावर उतरलेल्या ५ महिलांसह ८ लाेकांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्यातील विराेधी द्रमुकने या कारवाईचा विराेध केला आहे. सीएएच्या विराेधात संयुक्त रूपाने विराेध दर्शवण्यासाठी केरळच्या मुख्यमंत्री पी. विजयन यांनी रविवारी विविध पक्ष तसेच सामाजिक, धार्मिक संघटनांची बैठक घेतली. तीन तासांपर्यंत चाललेल्या बैठकीत आमदार, खासदार तसेच माेठे नेते उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...