आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • BJP Leaders, Shubangini Raje Of Baroda And Zafar Islam Because These Are The Faces, Who Showed Jyotiraditya His Way To The BJP.

भाजप नेत्या, बडाेद्याच्या शुभांगिनी राजे आणि जफर इस्लाम कारण हेच ते दाेन चेहरे आहेत, ज्यांनी ज्याेतिरादित्य यांना भाजपमध्ये येण्याचा मार्ग दाखवला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कधीकाळी माेदींच्या समर्थक हाेत्या शुभांगिनी, त्यांचे लक्ष्मी विलास बर्मिंगहॅम पॅलेसपेक्षा चारपट माेठे
  • असे आहे ज्योतिरादित्य शिंदे आणि शुभांगिनी राजे यांचे कनेक्शन

> जन्म :  २४ फेब्रुवारी १९४५ > शिक्षण : बीए ऑनर्स इतिहास, इंग्रजी साहित्य आणि अर्थशास्त्र(लखनऊ विश्वविद्यालय) >  पती : रणजित सिंह गायकवाड ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपत आणण्यात शुभांगिनी राजे गायकवाड यांची महत्त्वाची भूमिका होती, असे मानले जाते. वृत्तानुसार, शुभांगिनीनेच शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ आणले. बडोदा राजघराण्यात राजमातेचा दर्जा प्राप्त केलेल्या शुभांगिनी ग्वाल्हेरशीही संबंधित आहे. त्या ग्वाल्हेरच्या शाही जाधव कुटुंबातील आहेत.  तथापि, राजघराण्याने अशा कोणत्याही भूमिकेस अधिकृतपणे नकार दिला आहे. ७५ वर्षीय शुंभागिनी राजे स्वत: भाजपच्या नेत्या आहेत. बडोद्याच्या खेडा संसदीय मतदारसंघातून त्यांनी दोनदा लोकसभा निवडणूक लढविली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने १९९६ आणि २००४ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. शुंभागिनी राजे बडाेद्याच्या खेडा मतदारसंघातून दाेनवेळा लाेकसभा निवडणूक लढल्या आहेत. १९९६ मध्ये अपक्ष आणि २००४ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढल्या. परंतु दाेन वेळा त्या हरल्या. २०१४ लाेकसभा निवडणुकीत नरेंद्र माेदी यांनी बडाेद्यातून नामांकन दाखल केले हाेते. शुभांगिनी राजे त्यावेळी त्यांच्याबराेबर हाेत्या. त्या माेदींच्या समर्थक हाेत्या. शुभांगिनीचे पती रणजित सिंह गायकवाड कांॅग्रेसचे नेते हाेते. ते १९८० ते ८९ पर्यंत बडाेद्याचे कांॅग्रेसचे खासदार हाेते. शुभांगिनी आता प्रकृतीमुळे लाइमलाइटपासून दूर असतात. त्या आता आपला बहुतांश वेळ बडाेद्यातील आपल्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये व्यतीत करतात. त्या २०१५ पासून बडाेद्याचे  द महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत.

शिंदे कनेक्शन :


ज्याेतिरादित्य शिंदे यांची पत्नी प्रियदर्शनी राजे बडाेदा राजघराण्याच्या आहेत. बडाेद्याच्या राजमाता शुंभागिनी राजे प्रियदर्शनीच्या माेठ्या आई आहेत. एका माध्यमाच्या नुसार गायकवाड कुटुंबाकडे २० हजार काेटी रुपयांची एकूण संपत्ती आहे. एकटा लक्ष्मी विलास पॅलेस ६०० एकर जागेत पसरलेला आहे. लक्ष्मी विलास पॅलेस देशातील सर्वात माेठे खासगी घर आेळखले जाते. ६०० एकरात बनलेला हा महाल ब्रिटनचे शाही निवास बर्किंगहॅम पॅलेसच्या तुलनेत चारपट माेठा आहे. गायकवाड परिवारात वडिलाेपार्जित संपत्तीवरून वाद सुरू आहे.