वक्तव्य / 'मेगाभरतीमुळेच भाजपची राज्यात सत्ता गेली' - खडसे; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनंतर खडसेंचाही वार

छत्रपतींना पुरावे मागणे मूर्खपणा - खडसे 

प्रतिनिधी

Jan 19,2020 08:54:00 AM IST

जळगाव : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटलांनंतर आता एकनाथ खडसे यांनीही मेगाभरतीनंतरच्या पानिपतावर तोंडसुख घेतले आहे. खडसे म्हणाले, 'लाेकांची पारख न करता भाजपमध्ये केलेल्या मेगाभरती माेहिमेमुळे राज्यात भाजपची दुरवस्था झाली व सत्ता गेली.'


जळगावातील पत्रकार परिषदेत खडसे म्हणाले, 'निवडणुकीपूर्वी भाजपत अनलिमिटेड मेगाभरती झाली. नव्याने पक्षात येणाऱ्यांमुळे अापलीच सत्ता येणार याची खात्री बाळगून पक्षातील चाैकडीने माझ्यासारख्यांसह काही निष्ठावंतांना उमेदवारी दिली नाही. जनतेने या पक्षांतरवीरांना त्यांची जागा दाखवली. चुकीच्या लाेकांची मेगाभरती ही पक्षाला मारक असल्याचे पक्षात मी एकटाच जाहीरपणाने वारंवार मांडत हाेताे. अाता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनादेखील माझे मत पटल्याने त्यांनी मेगाभरतीच्या विषयावर चिंता व्यक्त केली अाहे.'


छत्रपतींना पुरावे मागणे मूर्खपणा


छत्रपती शिवाजी महाराज हे अाराध्य दैवत अाहेत. त्यांच्या वंशजांना पुरावे मागणे हे दुर्दैवी अाहे. अापण त्यांनाच काय, काेणलाच असले पुरावे मागू शकत नाहीत. खासदार संजय राऊत यांनी असे वक्तव्य करायला नकाे हाेते. राज्याला असले वाद अाेढवणे परडवणारे नसल्याचे खडसे म्हणाले.

X
COMMENT