आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीत फक्त ९ जागांचा फटका, बंगाल, ओडिशात २२ जागा मिळवून केली भरपाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेम मेकर

ज्या राज्यांत सत्ता गमावली, तेथे ६५ पैकी ६२ जागा जिंकल्या.
२०१४ मध्ये गुजरात, उ.प्र., राजस्थान, मप्र, छत्तीसगड, महाराष्ट्र, हरियाना, हिमाचल, उत्तराखंड, बिहार व दिल्लीत एकूण २७३ जागांपैकी २४० जागा जिंकणाऱ्या भाजपने या वेळी २४६ जागा जिंकल्या. चार महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणूक झालेल्या मप्र, राजस्थान व छत्तीसगडमध्ये सरकारे गमावूनही भाजपने या तीन राज्यांत ६२ म्हणजे २०१४ एवढ्याच जागा जिंकल्या. 

 

यूपीत ६२ जागा वाचवल्या, सपा-बसपाला जोरदार प्रत्युत्तर
२०१४ मध्ये यूपीत ७१ जागा जिंकणाऱ्या भाजपला ६२ जागा मिळाल्या. सपा-बसपाची शक्ती पाहता ४० जागांचा फटका बसू शकत होता. या पक्षांच्या जातीय मतपेढीवर मोदींचा राष्ट्रवादाचा मुद्दा वरचढ ठरला.

 

कर्नाटकात सरकार गमावले तरी २८ पैकी २४ जागा जिंकल्या
२०१४ मध्ये भाजपने बंगालमध्ये २ तर ओडिशात फक्त १ जागा जिंकली होती. या वेळी भाजपने बंगालमध्ये १८, ओडिशात ९ जागा म्हणजे २२ जागा अधिक मिळवल्या. कर्नाटकातही जोरदार कामगिरी करत २४ जागा जिंकल्या. काँग्रेस-जेडीएस युती असूनही त्यांना केवळ २ जागा मिळाल्या. 

 

आता पुढे काय ? 

राम मंदिरावर कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा, निर्णय विरोधात गेल्यास अध्यादेश शक्य 
सुप्रीम कोर्टाद्वारे स्थापन करण्यात आलेली तीन माजी न्यायमूर्तींची मध्यस्थी समिती ऑगस्टमध्ये अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर कोर्टाचा निर्णय मंदिर उभारणीच्या विरोधात आल्यास सरकार अध्यादेश काढू शकते. निवडणुकीवेळी भाजपच्या नेत्यांनी तसा उल्लेख केला आहे. निर्णय मनासारखा आल्यास सरकार मंदिर उभारणीस गती देऊ शकते. 

 


कलम -३७० रद्द करणे सर्वात मोठे आव्हान राहील, शहा यांनी तसे आश्वासन दिले आहे
प्रचारावेळी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर केले आहे की, सत्तेत येताच काश्मीरमधून कलम -३७० रद्द करण्यात येईल. यासाठी शिवसेनाही सातत्याने दबाव टाकते आहे. त्याशिवाय काश्मीरमध्ये पाकिस्तानी नागरिकांना वास्तव्य करण्याचा अधिकार देणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील निर्णयाची  सरकारला प्रतीक्षा आहे. 

 


पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, अधिवेशनात यासाठी मंजुरी शक्य  
पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न प्राप्तिकरातून मुक्त करण्याचा मसुदा संसदेत येईळ. निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने ही घोषणा केली होती की, ही सूट एक एप्रिलपासून लागू होईल.

 

मोदींच्या १४४ सभा, शहांच्या मोदींपेक्षा १६१ अधिक

भाजपच्या सर्व्हेत मोदींची लोकप्रियता ५० टक्के होती. एअरस्ट्राईकनंतर ती ७२ टक्के झाली. त्यामुळे अमित शहा यांनी केवळ मोदींच्या नावावर निवडणूक लढवण्याची यशस्वी रणनीती आखली.

 

> मोदींच्या लाटेत उमेदवारांबद्दलची नाराजी संपवणे ही पण एक रणनीती होती. त्यामुळे प्रत्येक मत मोदींच्या नावावर मागण्यात आले. मोदींनीही उमेदवारांची नावे घेतली नाहीत.

 

> तत्पूर्वी शहा यांच्या सूक्ष्म व्यवस्थापनाअंतर्गत एका बुथवर ९० सक्रिय कार्यकर्ते होते. सामाजिक विचार करून बुथवर २०-२० (१.८ कोटी) कार्यकर्ते ठेवले. {देशभर १६१ कॉल सेंटर उघडले, यातून १५६८२ कॉलर जोडले. राज्य, केंद्र सरकारच्या योजनांतील २४.८१ लाभार्थींशी संवाद साधला जाणार होता.

 

> ज्यांच्याबद्दल तक्रारी होत्या अशा १२० खासदारांची तिकिटे कापली. या जागी १०० हून अधिक नवे चेहरे निवडून आणले.

 

दिग्गजांना पराभवाचा धक्का

राहुल गांधी, अमेठी (उत्तर प्रदेश)
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना स्मृति इराणी यांनी ३८,३४५ मतांनी पराभूत केले. संजय गांधींनंतर ४२ वर्षांत प्रथमच गांधी कुटुंबातील व्यक्ती येथे हरली.

 

ज्योतिरादित्य शिंदे, गुना (मप्र)
कृष्णपालसिंह यांनी ज्योतिरादित्य शिंदेंना पराभूत केले. ६२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच शिंदे कुटुंबातील उमेदवारास गुनामध्ये पराभव पत्करावा लागला.

 

एच. डी. देवेगौडा, तुमकूर (कर्नाटक)

एच. डी. देवेगौडा यांना भाजपचे जी. एस. बसवराज यांनी १२,३८७ मतांनी पराभूत केले. त्यांच्या पक्षाला फक्त एक जागा मिळाली.