आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Lucknow Seat Row News In Marathi, Lalji Tandon Rajnath Singh Latest News

भाजपमध्ये मतदारसंघांवरून सुंदोपसुंदी, राजनाथसिंह यांना हवा लखनौ मतदारसंघ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाच्या तिकीट वाटपावरून सुरू झालेला वाद काही शमताना दिसत नाही. आता लखनौच्या जागेवरून वाद सुरू झाला आहे. लखनौ येथील खासदार लालजी टंडन यांनी सांगितले आहे, की जर पक्षाने सांगितले तर केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी मी माझा मतदारसंघ देण्यास तयार होईल. इतर कुणालाही येथून निवडणूक लढू देणार नाही.
भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह या जागेवरून निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छूक आहेत. राजनाथसिंह सध्या गाजियाबाद येथील खासदार आहेत. गाजियाबाद सोडून लखनौ येथून राजनाथसिंह लढणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
लखनौच्या मतदारसंघापूर्वी भाजपमध्ये वाराणसीच्या जागेवरून वाद उद्भवला होता. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना ही जागा द्यावी, अशी भाजपची योजना आहे. परंतु, येथील खासदार मुरली मनोहर जोशी ही जागा सोडण्यास तयार नव्हते. याबाबत नरेंद्र मोदी यांनी मात्र सुचक शांतता बाळगली आहे. जोशी यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचा पाठिंबा मिळाल्याने या प्रकरणाला बरीच हवा मिळाली होती.
परंतु, रविवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत जोशी यांनी सांगितले, की जर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटले तर मी माझा मतदारसंघ सोडण्यास तयार आहे. या जागेसंदर्भात भाजपच्या संसदीय समितीची 13 मार्च रोजी बैठक होणार आहे.