आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांच्या बालेकिल्यात मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती- भाजप आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर महानाजेश यात्रेनिमित्त जनतेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. ही महाजनादेश यात्रा आज(14 सप्टेंबर) शरद पवारांच्या बाले किल्यात म्हणजेच बारामतीत आली होती. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासोबत नुकतंच भाजपात आलेले हर्षवर्धन पाटील, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील इत्यादी नेते होते. यावेळी पवारांवर टीका केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि भाजपविरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे शांतता परिसरात डीजे लावण्या वरुन आणि चौका-चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लावलेले पोस्टर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून काढण्यात आल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. या सर्व वादानंतर पोलिसांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला.
भाजपची महाजनादेश यात्रा आज पवारांच्या बारामतीत आली होती. यानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे पोस्टर लावले होते. हे सर्व पोस्टर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून काढण्यात आले. तसेच शांतता परिसरात डीजे लावल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तो काढण्यात आल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. या यात्रेदरम्यान, भर रस्त्यात सभा भरण्यात आली. शहरात दोन मोठे मैदान असूनही, भर रस्त्यात सभा घेतल्यामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे मैदानात सभा न घेता रस्त्यावर सभा घेतल्याने नागरिकांमध्येही नाराजीचा सुर आला.
दरम्यान, भाषणावेळी मुख्यमंत्र्यांनी पवार कुटुंबावर जोरदार टीका केली. यावेळी "बुरे काम का बुरा नतीजा, सुन भाई चाचा हा भतिजा" असे म्हणाल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आक्रमक होऊन, त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर त्यांच्याकडून शरद पवार आणि अजित पवारांच्या समर्थनात घोषणा देणे सुरू केले. यावेळी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी जलद कृती दलाच्या जवानांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. या लाठी चार्जमध्ये काही कार्यकर्त्यांना किरकोळ मारहाण झाली असून, पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे. सध्या शहरात सर्वत्र पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...