आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यातून रावसाहेब दानवेच लढणार..भाजपची पहिली यादी तयार, महाराष्ट्रातील 7 उमेदवारांची नावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी तयार झाली असून ती पुढील एक-दोन ‍दिवसात जाहीर केली जाणार आहे. शिवसेना-भाजपचा सर्वात मोठा तिढा असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना तिकीट निश्चित करण्यात आले आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. आता अर्जुन खोतकर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.


पुण्यात गिरीशबापटांची माघार तर भिवंडीतून पुन्हा कपिल पाटील

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभेतून भाजपकडून पुन्हा उमेदवारी देणक्यात आली आहे. बापटांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे पुण्यात भाजपचा उमेदवार कोण? आता हा प्रश्न पडला आहे.

दुसरीकडे, भाजपकडून भिवंडीतून कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. भिवंडीतील स्थानिक शिवसेना कार्यकर्ते आणि केबल ऑपरेटर्सकडून कपिल पाटील यांना कडाडून विरोध होत आहे. तरी देखील भाजपने भिवंडीतून कपिल पाटील यांनाच संधी दिल्याची माहिती मिळाली आहे.

 

भाऊ, आता मागे हटायचं नाही...शिवसैनिकांचा खोतकरांच्या निवासस्थानी ठिय्या

दरम्यान, 'भाऊ, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटू नका, जालन्यातून निवडणूक लढवाच. तसे जोपर्यंत जाहीर करीत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही,' असे म्हणत शिवसैनिकांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील निवासस्थानी मंगळवारी ठिय्या मांडला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय घेतील, त्यांचा आदेश अंतिम राहील, असे सांगत खोतकर यांनी शिवसैनिकांची समजूत काढली. तत्पूर्वी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

शिवसेना-भाजप युती होऊनही आपण लोकसभेच्या मैदानात असल्याचे सेना नेते अर्जुन खोतकर यांनी जाहीर केले. जागावाटपात जालना भाजपकडे असून रावसाहेब दानवे हे उमेदवार असतील. या वादात मुख्यमंत्र्यांसह सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मध्यस्थी केली. नंतर खोतकरांनी उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. तरी खोतकर निवडणूक लढणार किंवा नाही, हा संभ्रम कायम आहे.

 

पहिल्या यादीतील महाराष्ट्रातील उमेदवार...

नागपूर -नितीन गडकरी
चंद्रपूर – हंसराज अहीर
जालना – रावसाहेब दानवे
पुणे – गिरीश बापट  
अकोला – संजय धोत्रे
भिवंडी – कपिल पाटील
गडचिरोली – अशोक नेते

बातम्या आणखी आहेत...