आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा विरोध झुगारून भाजपच्या जाहीरनाम्यात राम मंदिराचा उल्लेख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज (सोमवार) सुरवात झाली. यावेळी भारतीय जनता पक्षाने जनतेसमोर जाहीरनामा सादर केला असून त्यात राम मंदिराचा उल्लेख करण्यात आला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिर उभारले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे जाहीरनाम्यात राम मंदिराचा उल्लेख नसावा, असा आग्रह भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा होता. तरीही हा मुद्दा जाहीरनाम्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
"एक भारत, श्रेष्ठ भारत" आणि "सबका साथ, सबका विकास" भाजपचे लोकसभा निवडणुकीतील प्रमुख स्लोगन्स राहतील. योजनांची दिवाळखोरी नसावी, सिस्टिम रिफॉर्म, भ्रष्टाचारमुक्त देश, टीम इंडिया याचा धोरणात्मक पातळीवर विचार केला जाणार आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी जाहीरनामा सादर केला. यावेळी भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह, नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, रविशंकर प्रसाद यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. अरुण जेटली अमृतसर येथून उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी गेले असल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.
भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे-
- काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करणार. कठोर उपाययोजना करणार.
- कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिराची उभारणी करणार.
- विदेशातील बॅंकांमध्ये असलेला काळा पैसा भारतात आणण्याला प्राथमिकता.
- ज्या क्षेत्रांमध्ये रोजगार आणि संपत्तीच्या वाढीसाठी थेट विदेशी गुंतवणुकीची गरज आहे, तेथेच एफडीआयला परवानगी देणार.
- नाशवंत शेतीमालाचा इतर भागांमध्ये पुरवठा करण्यासाठी अॅग्री रेल नेटवर्क उभारणार.
- हायस्पिड ट्रेन नेटवर्कसाठी डायमंड क्वॉड्रिलॅटरल प्रकल्प सुरू करणार.
- महागाई रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.
- शिक्षण आणि उद्योगात अल्पसंख्याकांना अधिक संधी देणार.
- केंद्र आणि राज्य सरकार या मधील संबंध सुधारण्यावर भर देणार.
- ज्युडिशिअल रिफॉर्म, इलेक्ट्रोल रिफॉर्मला प्राथमिकता देणार.
- नवीन आरोग्य धोरण आणले जाईल.
- ग्रामीण भागात वाय-फाय झोन उभारणार.
- महिला सबलीकरणासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड.
- टॅक्स व्यवस्था आणि बॅंकांची आर्थिक स्थिती सुधारण्यावर विशेष भर.
- प्रत्येक राज्याच्या राजधानीत एम्स उभारले जाईल.
- नॅशनल ई-वाचनालय सुरू केले जाईल. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल.
- राष्ट्रीय मदरसा विकास कार्यक्रम राबविला जाईल. उर्दू भाषेचे संरक्षण आणि प्रसार केला जाईल.
- एससी, एसटी प्रवर्गातील नागरिकांना सामाजिक न्याय आणि सबलिकरण करण्यावर भर.
- शहरी आणि ग्रामीण भारतातील दरी दूर करणार.
- प्रत्येक भारतीयाला पक्क्या घराचे आश्वासन.
जाहीरनाम्यात राम मंदिराचा उल्लेख करण्यास का होता मोदींचा विरोध... वाचा पुढील स्लाईडवर