आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप पदाधिकाऱ्यांचे फलक, पालिका अधिकाऱ्यांचे अभय; उभारलेल्या फलकाकडे डोळेझाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-  नाशिकरोड भागात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून होर्डिंग्ज हटविण्याची कारवाई सुरू असली तरीही, त्यातून भाजप पदाधिकाऱ्यांनी उभारलेल्या फलकाकडे मात्र डोळेझाक केली. त्यामुळे महापालिकेचा हा दुजाभाव चर्चेचा मुद्दा ठरला आहे. 

 

नाशिकरोड परिसरात महापालिकेच्या जागांवर चौकाचौकांत अनधिकृत फलक लावून शहराचे विद्रुपीकरण होत असताना, वाहतूक बेटांसह दुभाजकांतील फलक अपघातांचे कारण ठरत आहेत. असे असतानाही त्याकडे पालिकेकडून सोयीस्कर डोळेझाक केली जाते आहे. त्याबाबत ओरड झाल्यानंतर अखेर पालिकेने कारवाई हाती घेतली. 

 

नाशिकरोड विभागात भाजपचे १२ आणि एक स्वीकृत असे १३ नगरसेवक आहेत. त्यामुळे सभापतीपदही भाजपकडे असल्याने पदाधिकाऱ्यांच्या मर्जीने अतिक्रमण निर्मूलनाबाबत निर्णय घेतला जात असल्याची चर्चा नाशिकरोड परिसरात सुरू झाली आहे. बिटको चौकात या फलकांमुळे अपघात होत असतात. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पालिका अधिकारीही त्यांना साथ देत असल्याचे चित्र अाहे. शुक्रवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाने भाजपने लावलेल्या फलकाच्या बाजूचा फलक हटविला. मात्र, या फलकाला हातही लावला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांबाबत संताप निर्माण झाला अाहे. 

 

बातम्या आणखी आहेत...