आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - उत्तरप्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील चैनपूर मतदार संघाचे आमदार राजेश मिश्रा ऊर्फ पप्पू भरतौल यांच्या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. साक्षीने दलित युवक अजितेश कुमारसोबत वैदिक हिंदू परंपरेनुसार विवाह केला. यामुळे तिला आणि पतीच्या जीवाच्या वडिलांपासून धोका असून सुरक्षा देण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. याबाबत साक्षीचे वडील राजेश मिश्राने मीडियासमोर एक प्रेस रिलीज जारी केले. त्यांचे म्हणणे आहे की, मुलगी संज्ञान असून तिला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी कोणालाही जीवे मारण्याची धमकी दिली नाही.
भाजप आमदार राजेश मिश्राने प्रेस रिलीज जारी करत लिहिले की,
''माझ्या विरोधात मीडिया जे काही सुरु आहे ते चुकीचे आहे. मुलगी संज्ञान असून तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मी किंवा माझे सहकारी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनी कोणालाही जीवे मारण्याची धमकी दिली नाही.
मी आणि माझा परिवार आपापल्या कामात व्यस्त आहे. मी आपल्या मतदार संघातील लोकांचे काम करत आहे. माझ्याकडून कोणालाही काहीच धोका नाही.''
साक्षीने बरेलीचे खासदार, आमदार आणि मंत्र्यांना केली विनंती
यानंतर साक्षीने एक दूसरा व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओत तिचे वडील आमदार राजेश मिश्रा, भाऊ विक्की आणि वडिलांच्या साथीदारांपासून तिच्या जीवाला धोका असून तिला आणि तिच्या पतीला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी बरेलीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. सर्व लोक मिळून त्यांनी हत्या करणार असल्याचा आरोप साक्षीने केला आहे. साक्षीने बरेलीचे खासदार, आमदार आणि मंत्र्यांना आपल्या वडिलांची मदत न करण्याची विनंती केली आहे.
मुलांचा पत्ता माहीत नसल्याने पोलिसांपुढे पेच उभा
बरेलीचे डीआयजी आर.के. पांडे यांनी सांगितले की, साक्षी मिश्राचे दलित युवक अजितेश कुमार सोबत विवाह झाल्याची वार्ता व्हायरल व्हिडिओद्वारे मिळाली. हे प्रकरण लक्षात येताच त्यांनी बरेलीच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना साक्षी आणि अजितेशला सुरक्षा देण्याचे निर्देश दिले आहेत. पांडेय यांनी सांगतिले, की ते सध्या कोठे आहेत याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस कोठे पाठवावेत हा प्रश्न उपस्थित आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.