आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या महिला आमदाराची जीभ घसरली; भर सभेत म्हणाल्या, त्या किन्नरपेक्षा वाइट!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपच्या महिला आमदार साधना सिंह यांनी बसप सुप्रिमो मायावतींवर केलेल्या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधानामुळे राजकारणात गोंधळ उडाला आहे. उत्तर प्रदेशच्या मुगलसराय येथून आमदार असलेल्या साधना यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये साधना सिंह यांनी मायावतींवर एकानंतर एक अतिशय वादग्रस्त शब्दात टीका केली. सोबतच, मायावतींना तृतीयपंथियांपेक्षा वाइट म्हटले आहे. गेस्ट हाऊस घोटाळ्यात मायावतींचे चीरहरण झाले होते तरीही त्यांनी आघाडी केली अशा शब्द साधना सिंह यांनी उगारले आहेत.


आमदार साधना सिंह यांनी मायावतींवर अनेक स्वरुपाच्या टीका केल्या. एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना त्या म्हणाल्या, "आम्हाला वाटते की माजी मुख्यमंत्री महिला किंवा पुरुष हे दोन्ही नाहीत. त्यांना आपल्या सन्मानाशी काहीच घेणे-देणे नाही. द्रौपदीचे सुद्धा चीरहरण झाले होते. द्रौपदीने त्या चीरहरणाचा बदला घेतला होता. त्या एक स्वाभिमानी महिला होत्या. आजची एक महिला आहे जिचे सर्वच काही लुटले गेले आणि तरीही खुर्ची मिळवण्यासाठी तिने आपले मान-सन्मान विकले. अशी महिला असलेल्या मायावतींचा आम्ही या कार्यक्रमात तिरस्कार करतो. त्या नारी जातीवर कलंक आहेत." यानंतरही साधना सिंह यांनी इतक्या निच्च पातळीवर जाऊन टीका केली की ती सांगणे सुद्धा कठिण आहे.

 

#WATCH:BJP MLA Sadhna Singh says about BSP chief Mayawati, "jis din mahila ka blouse, petticoat, saari phat jaaye, wo mahila na satta ke liye aage aati hai. Usko pure desh ki mahila kalankit maanti hai.Wo to kinnar se bhi jyada badtar hai, kyunki wo to na nar hai, na mahila hai." pic.twitter.com/w3Cdizd8eR

— ANI UP (@ANINewsUP) January 19, 2019

 

भाजप नेत्यांना वेड्यांच्या रुगणालयात भरती करा...
साधना यांच्या वादग्रस्त विधानानंतर बसपने पलटवार केला. बसपचे नेते सतीशचंद्र मिश्रा म्हणाले, "साधना सिंह यांच्या विधानावरून भाजपचे स्तर दिसून येत आहे. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात आघाडीने भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना आग्रा किंवा बरेली येथील वेड्यांच्या रुगणालयात भरती करायला हवे.'' तर दुसरीकडे अखिलेश यादव यांनीही ट्वीट करून आपला विरोध दर्शवला आहे.

 

मुगलसराय से भाजपा की महिला विधायक ने जिस तरह के आपत्तिजनक अपशब्द सुश्री मायावती जी के लिए प्रयोग किए हैं वे घोर निंदनीय हैं. ये भाजपा के नैतिक दिवालियापन और हताशा का प्रतीक है. ये देश की महिलाओं का भी अपमान है.

— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) January 19, 2019

 

 

बातम्या आणखी आहेत...