आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेकिंग दरम्याने महिला पोलिसाने आमदाराच्या गाडीला थांबवले, म्हणाल्या- चौकीदार वाली नंबर प्लेट काढा, आमदार म्हणाले- मॅडम मी आमदार आहे, 40 मिनीटे चालला वाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडवा(मध्यप्रदेश)- आचार संहितेत सोमवारपासूनच पोलिस कारवाई करत आहेत. संध्याकाळी अंदाजे 7.30 वाजता इंदिरा चौकात महिला काँस्टेबल ज्योती सुर्यवंशी आणि पोलिस जवान गाड्यांना थांबवून नाव असलेल्या नंबर प्लेट्सला काढत होते. या दरम्यान पंधानाचे आमदार राम दांगोरे यांची गाडी पोलिसांनी थांबवली. त्यांच्या गाडीच्या नंबर प्लेटच्या वरती दुसरी एक प्लेट होती, त्यावर चौकीदार पंधाना असे लिहीले होते. काँस्टेबलने जवानांना ती प्लेट काढण्यास सांगितले. तेव्हा आमदार म्हणाले- मॅडम कोणत्या नियमाअंतर्गत तुम्ही माझ्या गाडीची नंबर प्लेट काढत आहात, मी आमदार आहे. आचार संहितेचा मान ठेवून मी आधीच माझ्या गाडीवरू आमदार नावाची प्लेट काढली आहे. चौकीदारची प्लेट का लावू शकत नाहीत, असा कोणता नियम असेल तर सांगा. यावेळी काँस्टेबल आणि आमदारात जोरदार वाद झाला.


नंबर प्लेट काढण्याचे दिले आदेश
काँस्टेबलला आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर म्हणाल्या- तुमच्या गाडीवर तर नंबर प्लेटदेखील नाहीये. आमदार म्हणाले- आदी तुम्ही चौकीदार असलेल्या प्लेट काढयला लावली आता नंबर प्टेलबद्दल बोलताय. तेव्हा जवानांनी काँस्टेबलला सांगितले- मॅडम गाडीवर तर नंबर प्लेट लावलेली आहे. त्यानंतर काँस्टेबल म्हणाल्या- गाडीच्या मागे कमळाचे फुल लावले आहे. आमदार म्हमाले- दाखवा कमळाच फुल कुठे आहे. कमलाचे फुलदेखील नव्हते. त्यानंतर आमदार म्हणाले- तुम्ही काँग्रेसच्या इशाऱ्यावर आमच्या चौकीदार कँपेनला वाईट ठरवत आहात. अशा प्रकारे त्यांच्यात 40 मिनीटे वाद सुरू होता.


काय आहे नियम
मोटरयान अधिनियम 51 अंतर्गत तुम्ही मोटारसायकलमध्ये कोणत्यीह प्रकारचा बदल करू शकत नाहीत. नंबर प्लेटसोबतदेखील कोणत्याही प्रकारची छेडछाड करू शकत नाहीत. नियमाचे उल्घंन केल्यास 500 रूपयांचा दंड आकारला जातो.

बातम्या आणखी आहेत...