आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीने नकार दिल्यामुळे भाजप आमदाराच्या नातवाने दिली अॅसिड अटॅकची धमकी, नंतर रात्री तलवार घेऊन गेला मुलीच्या घरी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुना(मध्यप्रदेश)- गुना शहराचे भाजपचे आमदार गोपीलाल जाटव यांच्या नातवाने आधी मुलीला अॅसिड अटॅक करून चेहरा खराब करण्याची धमकी दिली, नंतर तिच्या घरी तलवार घेऊन गेला. मुलीच्या घराचे दार बंद असल्यामुळे त्याने जोराने ओरडून मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली, आणि नंतर तिच्या दारावर तलवारीने वार केले. युवकाने केलेला हा प्रकार मुलीच्या घरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे.


तरूणीने सांगतले- महावीरपूरामध्ये राहणारा उमाशंकर जाटव 2 वर्षांपासून मला त्रास देतोय. मला बळजबरीने बोलण्यास सांगत होता. माझ्यासोबत व्हिडिओदेखील बनवला आणि सेल्फी घेतली. त्याचे हे कृत्य वाढतच होते. मागच्या वर्षी त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यातदेखील गेले होते, पण त्याचे आजोबा आमदार असल्यामुळे पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. तो शुक्रवारी रात्री 11.42 वाजता माझ्या घरी तलवार घेऊन आला आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली. दार उघडले नाही म्हणून त्याने दारावर तलवारीने वार केले. 


वडिलांना नोकरीवरून काढून टाकण्याची द्यायचा धमकी
आरोपी तरूण मुलीच्या वडिलांना आमदार आजोबाचे नाव घेऊन, नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी द्यायचा. तरूणी खूप घाबरली होती आणि त्यामुळेच कधी-कधी त्याच्याशी बोलत होती. तरूणाने तिच्यामनात इतकी भीती निर्माण केली होती की, तिला कॉलेजला जायलदेखील भीती वाटत होती. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली तरी, पोलिसांनी त्याला अटक केले नाही. या घटनेनंतर सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट ही घडली की, मीडियाचा एक ग्रुपदेखील आरोपीच्या बाजुने बोलत होता. ते सोशल मीडियावर मुलीच्या विरोधात अश्लील गोष्टी लिहीत होते.


आरोपीला लवकरच अटक केली जाईल
पीडितेच्या तक्रारीवरून आम्ही एफआयआर दाखल केली आहे. कायद्यानुसार न्यायाधिशासमोर तिची साक्ष नोंदवली आहे. आरोपीला लवकरच ताब्यात घेतले जाईल-अवनीत शर्मा, टी.आय.