आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Namo Again चे स्वेटशर्ट घालून संसदेत पोहोचले मोदी समर्थक खासदार, पंतप्रधानांनी केले कौतुक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 2019 लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता संसदेपर्यंत पोहोचला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान करा असे स्वेटशर्ट येथे पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार अनुराग ठाकूर संसद परिसरात मंगळवारी 'नमो अगेन' असे लिहिलेले स्वेटशर्ट घालून पोहोचले. त्यांनी अशा प्रकारची हूडी घालताना हूडी चॅलेंज सुद्धा दिला. सोशल मीडियावर फक्त भाजप समर्थकच नव्हे, तर पंतप्रधान मोदींना सुद्धा हा स्वेटशर्ट खूप आवडला आहे. पीएम मोदींनी ठाकूर यांचे ट्वीट रीट्वीट करून चांगले दिसत आहात असे म्हटले आहे.

 

Looking good, @ianuragthakur! https://t.co/mT28nAvH8d

— Narendra Modi (@narendramodi) January 8, 2019

 


केंद्रीय मंत्री थावरचंद यांनीही घातले होते स्वेटशर्ट
केंद्रीय सामाजिक न्याय आणि हक्क मंत्री मंत्री थावरचंद गहलोत यांनीही मोदी अगेनचे स्वेटशर्ट घातले होते. त्यांनी ट्वीट करून "मी तर घातलाय आपणही घातला आहात का? अशाच संकल्पाने तुम्हालाही हा स्वेटशर्ट घालायला हवा. नमो अगेन! 2019 मध्ये नरेंद्र मोदींनी पुन्हा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घ्यावी.'' गहलोत यांच्या ट्वीटनंतर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, राधामोहन सिंह, भाजप सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय आणि मध्यप्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनीही हॅशटॅगसह याचा प्रचार केला.

बातम्या आणखी आहेत...