आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP MP Car Collision: Security Forces Aims Riffles In High Alert After Bjp Mp Car Collides With Barrier Inside Parliament News And Updates

संसद परिसरात हल्ल्याच्या भीतीने जवानांनी ताणल्या रायफली, मग कळाले भाजप खासदाराची कार आदळली

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र वादळी ठरत आहे. त्यातच कौशांबी येथून भाजप खासदार विनोद सोनकर यांची कार बॅरिकेडला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की खासदारांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. अशात अनपेक्षित प्रसंग टाळण्यासाठी त्या ठिकाणी तैनात सुरक्षा रक्षकांनी वेळीच मोर्चा सांभाळला आणि चारही बाजूंनी घेराव टाकून रायफली ताणल्या. प्रत्यक्षात झाले असे की संसदेत प्रवेश करताना ही दुर्घटना घडली आणि सुरक्षेसाठी तैनात जवानांना ते खासदार असल्याची माहिती नव्हती. खासदार सोनकर यांनी आपले ओळखपत्र दाखवल्यानंतर तणाव निवळला.