आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP MP Ram Shankar Katheria Security Personnel Of Thrash Toll Plaza Employees And Fire In The Air

भाजप खासदाराच्या सुरक्षा रक्षकांची गुंडगिरी; टोल नाक्यावरील कर्माचाऱ्यांना मारहाण करत हवेत गोळीबार, व्हिडिओ व्हायरल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भाजप खासदार रामशंकर कठेरिया यांच्या सुरक्षा रक्षकांनी आग्र्यातील टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला मारहाण करत हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कठेरिया यांचा ताफा टोलनाक्यावरुन जात असताना टोल कर्माचारी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाल्याने ही घटना घडली. यावेळी कठेरिया स्वतः तेथे उपस्थित होते.


घटनेचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. टोल कर्माचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे अनेकजण कठेरिया यांच्यावर टीका करत आहेत. कठेरियांच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण करत हवेत गोळीबारही केला. यामुळे परिसरात भिती पसरली आहे.

 

 


खासदार कठेरिया आपल्या ताफ्यासोबत आग्र्याजवळील टोलनाक्यावरुन जात होते. यावेळी त्यांच्या गाडीशिवाय त्यांच्यासोबत 5 छोट्या गाड्या आणि 1 बस होती. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी एक-एक गाडी पुढे जाण्यास सांगितली. यावरुन कठेरियांच्या सुरक्षा रक्षकांचा टोल कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला. वाद वाढल्याने सुरक्षा रक्षकांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. घटनेनंतर टोल नाक्यावरील प्रमुखाने या तक्रार केली. यामध्ये ते म्हटले की, "रामशंकर कठेरिया यांचा ताफा व्हीआयपी लेनमधून जात नव्हता. यामुळे टोल कर्माचाऱ्यांनी एक-एक गाडी पुढे जाण्यास सांगितले, तेव्हा कठेरिया यांच्या सुरक्षा रक्षकांनी थेट कर्माचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कठेरिया यांना विनंती केली असता त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी हवेत गोळीबार केला."

बातम्या आणखी आहेत...