आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला चक्क लोकसभेतच देशभक्त म्हणणे भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोवले आहे. आधी विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून तीव्र निषेध केला. यानंतर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गुरुवारी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर विरुद्ध कठोर कारवाई करत असल्याचे जाहीर केले. नड्डा म्हणाले, "भाजप कधीच अशा स्वरुपाच्या वक्तव्यांचे समर्थन करत नाही. साध्वी प्रज्ञा यांना संसदेच्या संरक्षण समितीवरून हटवले जात आहे. या हिवाळी अधिवेशनात होणाऱ्या संसदीय गटाच्या बैठकीत त्यांना सहभागी केले जाणार नाही."
कारवाईनंतरही केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशींनी केला साध्वी प्रज्ञा यांचा बचाव
भोपाळ येथून खासदार असलेल्या वादग्रस्त भाजप नेत्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला बुधवारी लोकसभेत देशभक्त म्हटले होते. यावरून भाजपकडून कारवाई झाल्यानंतरही संसदीय कामकाज मंत्री प्रह्लाद जोशी साध्वींचा बचाव करताना दिसून आले. जोशींच्या मते, साध्वींनी कधीच नथुराम गोडसेचे नाव घेतले नाही. प्रत्यक्षात, द्रमुक खासदार ए राजा यांनी गोडसेचे वक्तव्य वाचून दाखवले. ज्यामध्ये गोडसेने गांधींची हत्या का केली हे सांगण्यात आले होते. यावर प्रज्ञा ठाकूरने त्यांना रोखताना सांगितले होते की आपण एका 'देशभक्ताचे' उदाहरण देऊ शकत नाही.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना जोशी पुढे म्हणाले, "प्रज्ञा ठाकूर यांचे माइक बंद होते. जेव्हा उधम सिंह यांचे नाव घेतले जात होते, तेव्हा त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिले की हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. त्यांनी गोडसे किंवा इतर कुणाचे नाव सुद्धा घेतले नाही. त्यांनी नाव घेतल्याचे रेकॉर्डमध्ये सुद्धा नाही. त्यामुळे, त्यांच्या (साध्वी) विरुद्ध अशा बातम्या पसरवणे चुकीचे आहे."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.