आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर इंडियाची विक्री करणे राष्ट्रविरोधी, यासाठी कोर्टात जाईल; भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा सरकारला घरचा आहेर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एअर इंडियाची 100% भागीदारी विक्रीच्या सरकारच्या योजनेवर सत्ताधारी भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी नाराजी वर्तवली आहे. एअर इंडियाची विक्री करणे हे राष्ट्रविरोधी असल्याचे म्हणत स्वामींनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. तसेच स्वामींनी या मु्द्द्यावरून सरकारविरोधात कोर्टात जाणार असल्याची चेतावणी दिली आहे. 
नागरी उड्डाण मंत्रालयाने सोमवारी एअर इंडियाच्या विक्रीची घोषणा करताच सुब्रमण्यम स्वामी भडकले. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, "हा करार पूर्णपणे देशद्रोही आहे आणि मी याविरोधात कोर्टात जाण्यास बांधिल आहे. आपण आपल्या कुटुंबातील रत्नाला असे विकू शकत नाही."

 

सरकारचा मोठा निर्णय 


कर्जाचा मोठा डोंगर असलेल्या एअर इंडियातील भागीदारी विकण्यासाठी सरकारने 17 मार्चपर्यंत निविदा मागविल्या आहेत. तसेच, सरकारने एअर इंडिया एक्सप्रेस आणि विमानतळ सेवा कंपनी आयसॅट्स या सहाय्यक कंपनीला विक्रीसाठी निविदा मागविल्या आहेत. एअर इंडियाची विक्री करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जीओएमच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कंपनीवर 50 हजार कोटींहून अधिक कर्ज 


एअर इंडिया बऱ्याच दिवसांपासून तोट्यात आहे. कंपनीला 2018-19 मध्ये 8,556.36 कोटी रुपयांचे नुकसान झाले. कंपनीवर तब्बत 50 हजार कोटींहून अधिक कर्ज आहे. यामुळे सरकारने एअर इंडियाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यापर्यंत विक्री प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना आहे.