Home | Maharashtra | Mumbai | BJP MP Yashwant Sinha criticism on modi government

केंद्रातील सर्व मंत्री बेरोजगार, एकच माणूस देश चालवतोय : यशवंत सिन्हांचे टीकास्त्र

विशेष प्रतिनिधी | Update - Aug 11, 2018, 07:50 AM IST

केंद्रातले सर्व मंत्री सध्या बेरोजगार आहेत. मंत्र्यांकडे त्याच्या विभागाची एकही फाइल जात नाही. कारण एकच माणूस देश चालवतो

 • BJP MP Yashwant Sinha criticism on modi government

  मुंबई- केंद्रातले सर्व मंत्री सध्या बेरोजगार आहेत. मंत्र्यांकडे त्याच्या विभागाची एकही फाइल जात नाही. कारण एकच माणूस देश चालवतो आहे. सारे निर्णय एकटे प्रधानमंत्री घेत आहेत. देशाचे सर्व निर्णय एकाच ठिकाणाहून केले जात आहेत, अशी टीका राष्ट्र मंचाचे संस्थापक व पूर्वाश्रमीचे भाजप खासदार यशवंत सिन्हा यांनी केली.


  गिरगाव चौपाटीजवळ शुक्रवारी राष्ट्र मंचाची सभा पार पडली. त्यात सिन्हा यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देशात भयाचे वातावरण आहे. वकील, न्यायाधीश, पत्रकार, खासदार सर्वच लोक भयाच्या सावटाखाली आहेत. मंत्रीसुद्धा घाबरलेले आहेत. आम्हाला काम द्या, अशी मोदी यांच्याकडे मागणी करण्याची त्यांच्यात हिंमत नाही, अशी टीका त्यांनी केली. लोकांनी निर्भय व्हायला पाहिजे, ते काम राष्ट्र मंच करेल, असे सिन्हा यांनी सांगितले.


  सर्व पुरावे समोर येऊनही न्यायाधीश निर्णय देण्यास घाबरत आहेत, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व काँग्रेस नेते अभय ठिपसे यांनी केला. दरम्यान, माझी प्राथमिकता भाजप नसून भारतीय लोक आहेत, असा टोला भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला लगावला. केंद्रातले मोदी सरकार दिल्लीत निवडून आलेल्या आप सरकारमध्ये प्राॅक्सी (छुपा) हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आप नेते संजय सिंह यांनी केला.


  भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो, दंगली घडवेल : शौरी
  माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांनी सरकारचे जोरदार वाभाडे काढले. ते म्हणाले, युवक, शेतकरी, कामगार, व्यापारी यापैकी कोणीच मोदींबरोबर नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल. देशात दंगली घडवल्या जातील. दहशती कारवाया होतील, लोकांना मारले जाईल. कदाचित २०१९ ची लोकसभा निवडणूक देशातील शेवटची निवडणूक असेल. भारतातील लोकशाही संकटात आहे, असा दावाही त्यांनी केला.

Trending