आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी दिला ‘अजेय भारत, अटल भाजप’चा नवा नारा; महाआघाडीचे धोरण व नेतृत्व अस्पष्ट, नियत भ्रष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाला ‘अजेय भारत, अटल भाजप’चा नारा दिला आहे. धोरण, नेतृत्व, विकास कार्यक्रम व १२५ कोटी देशवासीयांच्या विश्वासावर त्यांनी २०१९ निवडणुकीत विजयाची आशा व्यक्त केली. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोपाच्या भाषणात मोदींनी विरोधी पक्षांची महाआघाडीवर टीका केली. 


मोदी म्हणाले, महाआघाडीचे नेतृत्व व धोरण अस्पष्ट अन् नियत भ्रष्ट आहे. एकमेकांना पाण्यात पाहणारे लोक या आघाडीत आहेत. छाेटे पक्षही काँग्रेसचे नेतृत्व मान्य करण्यास तयार नाहीत. पुढील ५० वर्षे पक्ष सत्तेत राहील, असा विश्वास व्यक्त करत अमित शहा म्हणाले, २०१९ मध्ये भाजप आपल्या कामगिरीच्या जोरावरच जिंकेल. रविशंकर प्रसाद म्हणाले, हे आकलन घमेंड नाही तर केंद्राचे काम व उपलब्धींवर केले जात आहे.


इंधन दरांवर मात्र मौन
पेट्रोल-डिझेल दरवाढीवर राष्ट्रीय कार्यकारिणीत भाजपने मौनच बाळगले. इंधन दरवाढीबाबतच्या एका प्रश्नावर कंेद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, यूपीएच्या काळात महागाई दर १०% होता. मात्र मोदी सरकारच्या काळात तो ५ टक्क्यांच्या खाली आला आहे. 

 
शाह म्हणाले - 2014 पेक्षा जास्त जागा जिंकणार भाजप : 
पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी दावा केला की भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत 2014 पेक्षाही जास्त जागा जिंकणार आहे. शहा यांनी बैठकीत अजेय भाजपचा नाराही दिला. ते म्हणाले, ''महाआघाडी एक भ्रम, असत्य आहे. यात सहभागी पक्ष 2014 मध्ये भाजपकडून पराभूत झालेले आहेत. आघाडीचाही काडीमात्र परिणाम होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...