आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बंगळूरू/नवी दिल्ली- कर्नाटकात सत्तारूढ जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका पाहता काँग्रेसने याचे खापर भाजपच्या माथी फोडणे सुरू केले आहे. भाजप नेते येदियुरप्पांनी १८ काँग्रेस आमदारांना एकूण २०० कोटींचे आमिष दाखवल्याचा आरोप काँग्रेसने केला.
काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. येदियुरप्पा यांनी विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांना आपले समर्थक आमदार फोडण्यासाठी ५० कोटी आणि फुटलेल्या आमदारांना प्रत्येकी १० कोटी रुपयांचे आमिष दाखवले असल्याचे सुरजेवाला म्हणाले. या कटात पतंप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा सहभागी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
काय आहे ऑडिओत : मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जाहीर केलेल्या ऑडिओत येदियुरप्पा यांनी मोदी व शहा यांचे नाव घेऊन आमदारफुटीचे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले तरी दिल्लीत न्यायाधीशांशी चर्चा करून मार्ग काढतील, असे म्हटल्याचे ऐकू येते. यात २०० कोटींच्या देवाणघेवाणीचाही उल्लेख आढळतो. येदियुरप्पा आणि जेडीएसचे आमदार नागन गौडा यांचा मुलगा शरण गौडा यांच्यातील हा संवाद असल्याचा काँग्रेस नेत्यांचा दावा आहे.
ऑडिओ ऐकवला
काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ ऐकवला. यात काँग्रेस आमदार फोडण्याविषयीचे संभाषण असल्याचा दावा या नेत्यांनी केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.