राजकारण / भाजपकडून आमदारांना 50 कोटींची ऑफर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा आरोप; भाजपने आरोप फेटाळून लावले

आमदरा खरेदी-विक्रीचे 48 तासांत पुरावे अन्यथा महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा - सुधीर मुनगंटीवार 

दिव्य मराठी वेब टीम

Nov 08,2019 02:13:18 PM IST


मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनादेश मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप-शिवसेना दोघेही मुख्यमंत्री पदासाठी अडून बसलेले आहेत. भाजपकडून विरोधी पक्षांतील आमदारांना प्रलोभने दाखवण्याचे प्रयत्न सुरु असून आमदारांना 50 कोटींची ऑफर देण्यात असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मात्र भाजपने हे आरोप फेटाळून लावत काँग्रेसवर प्रत्यारोप केला आहे.


चार महिन्यांपूर्वी कर्नाटकातील मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकार पाडताना भाजपने “ऑपरेशन लोटस” पार पाडले होते. त्या धर्तीवर महाराष्ट्रात अशी मोहीम फत्ते करण्याची भीती संजय राऊत यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत केली होती. यानंतर दुपारी भाजपकडून आमदारांना 50 कोटींची ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. दरम्यान भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी चुकीची माहिती दिली असून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी सुधीर मुनगंटीवरा यांनी भाजपकडून केली आहे.

भाजपने कुणाशीही संपर्क केलेला नाही. तसेच काँग्रेस नेत्यांनी आमदार खरेदी-विक्रीचे येत्या 48 तासांत पुरावे द्यावेत अन्यथा त्यांनी खोटी माहिती पसरवल्या बद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी असे मुनगंटीवार म्हटले.


X
COMMENT