आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही बहुमत चाचणीसाठी तयार आहोत, भाजपची प्रतिक्रिया

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचा आम्ही आदर करतो तसेच बहुमत चाचणीसाठी पूर्णपणे तयार आहोत असा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून वाद सुरू असताना सुप्रीम कोर्टाने 24 तासांत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. त्यावर बोलताना, बहुमताचा आकडा सहज पार करणार असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.


कोर्टाच्या निकालानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, "आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आदर करतो. बहुमत सिद्ध करण्यासाठी आमची तयारी आहे आणि ती आम्ही दाखवून देऊ." न्यायालयाच्या निकालानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी बहुमत चाचणी पूर्ण करावी लागणार आहे. यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना निर्देश दिले, की त्यांनी सर्वच विधानसभा सदस्यांचा एकत्र शपथविधी घ्याव. यानंतर एक हंगामी विधानसभा अध्यक्ष ते निवडतील. ही निवड आणि बहुमत चाचणीमध्ये केले जाणारे मतदान छुपे असणार नाही. हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवड आणि बहुमत चाचणीच्या मतदानाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...