आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप मुंबई महापालिका महापौर पदासाठी उमेदवार देणार नाही, सध्या शिवसेनेकडेच राहणार पद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय जनता पक्ष मुंबईत महापौर पदासाठी आपला उमेदवार उतरवणार नाही असे भाजपच्या वतीने सोमवारी सांगण्यात आले आहे. भाजपने माघार घेतल्यानंतर या पदावर पुन्हा शिवसेनेचा नेते येणार हे स्पष्ट झाले आहे. मुंबई महापौर पदासाठी निवडणूक येत्या 22 नोव्हेंबर रोजी होत आहे. मुंबई महापालिकेत महापौर पदी निवडून येण्यासाठी आपल्याकडे पुरेसे संख्याबळ नाही असे भाजप नेते मनोज कोटक यांनी माध्यमाशी संवाद साधताना सांगितले. शिवसेना आणि भाजप यांची महायुती रविवारी तुटल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतरच मुंबई महापौर नेमके कोण बसणार असा प्रश्न निर्माण झाला होता.

महापौर पदासाठी राजकारण तापले असतानाच भाजप नेते आशीष शेलार यांनी एक ट्वीट केले. त्यामध्ये आपल्याकडे मुंबई महापालिकेत संख्याबळ कमी आहे. महापौर पदासाठी विरोधकांसोबत आघाडी करणार नाही. 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मात्र भाजपकडे निश्चितच बहुमत राहील असे ते म्हणाले आहेत.