सत्तानाट्याचा नवा अंक / भाजप सत्तेबाहेर, महाराष्ट्राचे भविष्य आता तिघांच्या हाती

जयपूर येथे एका रिसॉर्टवर असलेल्या या आमदारांनी रविवारी सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला भेट देऊन दर्शन घेतले.  जयपूर येथे एका रिसॉर्टवर असलेल्या या आमदारांनी रविवारी सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला भेट देऊन दर्शन घेतले. 

जयपुरात काँग्रेस आमदारांची बैठक, सेनेला पाठिंब्याबाबत निर्णय सोपवला पक्षश्रेष्ठींवर, शरद पवार सोनियांच्या संपर्कात

दिव्य मराठी

Nov 11,2019 07:58:00 AM IST

हेमंत अत्री

नवी दिल्ली - १०५ आमदारांचा राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सत्ता स्थापन करण्यास रविवारी असमर्थ असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सांगितले. यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेल्या (५६) शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. सोमवारी सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत शिवसेनेला मुदत देण्यात आली असून सेनेला १४५ या जादुई आकड्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
उच्चस्तरीय सूत्रांनुसार, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सोनिया गांधी यांच्या संपर्कात असून भाजप-एनडीएशी फारकत घेतल्यानंतर सोमवारी शिवसेना नेते संजय राऊत व सोनिया गांधी यांच्यात नवी दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने पािठंबा देण्याची तयारी दर्शवलीच तर सभापतिपद काँग्रेसला दिले जाऊ शकते. यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे. दुसरीकडे, शिवसेनेने विधिमंडळ नेेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केली असून मुख्यमंत्रिपद त्यांना दिले जाईल की दुसरा निर्णय होईल, हे स्पष्ट झालेले नाही.


दरम्यान, रविवारी भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत अमित शहा व्हीसीच्या माध्यमातून सहभागी झाले. यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन भाजप सरकार स्थापन करू शकत नसल्याचे कळवले.

जयपुरातही बैठका... : राज्यात सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू असताना काँग्रेसने आपले ४० आमदार जयपुरात हलवले आहेत. एका रिसॉर्टवर असलेल्या या आमदारांनी रविवारी सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला भेट देऊन दर्शन घेतले.

काँग्रेस महाराष्ट्राची दुश्मन नाही : संजय राऊत

सत्तास्थापनेसाठी काँग्रेसच्या पाठिंब्याबाबत विचारले असता सेनेचे नेते संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्ष काही महाराष्ट्राचा दुश्मन नाही. काँग्रेसने शिवसेनेसोबत महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नावर चांगली भूमिका घेतली होती. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो. एकूणच येत्या २४ तासांत राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडणार असून “शिवमहाआघाडी’ अशी नवी आघाडी जन्म घेण्याची शक्यता आहे.

खोटारडेपणाच्या मुद्द्याची टोचणी

रविवारी भाजप कोअर कमिटीत शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद द्यायचेच नाही, असा निर्णय घेण्यात आला. भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला तर भाजप आणि शहा हे खोटारडे असल्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होईल. म्हणून शिवसेनेसोबत न जाण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

३० वर्षे युतीचे

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर १९८९ मध्ये भाजप-सेना युती साकारली. या युतीचे मुख्य शिलेदार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेते प्रमोद महाजन होते. ३० वर्षे युती टिकली. आज मात्र युती भंग पावली.

भाजप सत्तेबाहेर, महाराष्ट्राचे भविष्य आता तिघांच्या हाती

> शरद पवार : पाच वर्षांनंतर सत्तेत येण्याची शक्यता. राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांना मिळेल धडा.

> उद्धव ठाकरे : एनडीएसह केंद्रातील सत्ता साेडावी लागेल. शरद पवार यांची भेट घेऊन राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा मागणार.

> साेनिया गांधी : शिवसेनेसारख्या कट्टर हिंदुत्ववादी पक्षाला पाठिंबा देणार का याकडे लक्ष. कर्नाटकचा बदला घेण्याची मिळणार संधी.

शिवसेना ५६+८+ राष्ट्रवादी ५४+ काँग्रेस ४४ = एकूण संभाव्य संख्याबळ : १६२

X
जयपूर येथे एका रिसॉर्टवर असलेल्या या आमदारांनी रविवारी सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला भेट देऊन दर्शन घेतले. जयपूर येथे एका रिसॉर्टवर असलेल्या या आमदारांनी रविवारी सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला भेट देऊन दर्शन घेतले.