आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Pm Candidiate Narendra Modi Rally In Amravati Akola And Nanded

गुजरातला शिव्या घालण्यापेक्षा काँग्रेसने काय केले ते सांगा, मोदींची राहुल गांधींवर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला / अमरावती / नांदेड - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) महाराष्ट्रामध्ये तीन प्रचारसभा केल्या. यात त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली. अमरावतीमध्ये ते म्हणाले, 'शहजादे शेतकर्‍यांचे आश्रू पुसण्यासाठी आले होते. मात्र त्यांनी गुजरात मॉडेलला शिव्या घातल्या. ते जिथे जातील तिथे गुजरातबद्दलच बोलत आहे. ते विसरून गेले आहेत, की निवडणूक गुजरातची नाही देशाची सुरु आहे. गुजरातला शिव्या घालण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या सरकारने काय केले हे सांगितले तर बरे होईल.'
अकोल्यात मोदींनी शेतकर्‍यांच्या प्रश्नावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. सरकारने कापूस निर्यातीवर निर्बंध का लादले, असा सवाल त्यांनी केला. त्यानंतर मोदींची मराठवाड्यातील नांदेडमध्ये प्रचारसभा झाली. येथे काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. देशभर गाजलेल्या आदर्श गृहनिर्माण प्रकल्पामुळे अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. यावरून मोदींनी काँग्रेस भ्रष्टाचार संपवण्यासाठी किती सक्षम आहे, असा सवाल केला.
महाराष्ट्रानंतर मोदी कर्नाटकातही प्रचारसभांना संबोधीत करणार आहेत. कर्नाटकात विजापूर आणि बेळगाव येथे त्यांच्या सभा होणार आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मोदींचा महाराष्ट्र दौरा