आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक पालिकेत ‌भाजपची सत्ता धाेक्यात; १३ नगरसेवकांनी फिरवली सहलीकडे पाठ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कापल्याने भाजपला रामराम ठाेकत प्रथम राष्ट्रवादी व त्यानंतर शिवसेनेत प्रवेश करणारे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपला सुरूंग लावत जवळपास १३ नगरसेवक फाेडल्याची चर्चा असून हे नगरसेवक भाजपने शनिवारी (दि. १६) नगरसेवकांची सहल काढल्यावेळी अनुपस्थित राहिल्यामुळे महापाैर निवडणूक प्रचंड चुरशीची हाेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यातील तीन महिला नगरसेवकांनी प्रसूतीचे कारण देत पाठ फिरवली, तर एका नगरसेवकाने महापाैरपदाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपबाबत भूमिका ठरवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप विरुद्ध महाशिवआघाडी असा सामना वरवर दिसला असला तरी, वस्तुत: माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नाशकातील साम्राज्यालाच दणका देण्याची तयारी सानप यांनी केल्याचे लपून राहिलेले नाही. भाजपचे ६५ नगरसेवक असून शनिवारी महापाैर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीमुळे सहल काढण्याचा निर्णय झाला, तेव्हा फक्त ४८ नगरसेवक सहभागी झाल्याचे पहायला मिळाले. ..तर भाजपचे संख्याबळ ५२ वर राहण्याची शक्यता


माजी आमदार अपूर्व हिरे यांचा एक, तर राष्ट्रवादीच्या विचारधारेशी संबधित दाेन असे तीन नगरसेवकही अनुपस्थित असल्याचे सांगितले जाते. पाच ते सहा नगरसेवक हे भाजपसाेबत असून त्यातील काही इच्छुक तर काही दवाखान्याचे कारण देत सहभागी झालेले नाहीत. मात्र, हे नगरसेवक भाजपसाेबत असून तुर्तास ६५ पैकी १३ नगरसेवक फुटीची शक्यता राहिल्यास भाजपचे संख्याबळ ५२ इतके हाेणार आहे.