आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा जाहीरनामा घोषित; दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पासह बरंच काही...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून मंगळवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे, माधव भांडारी आणि केशव उपाध्ये यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात डॉ. आंबेडकरांचे स्मारक, ऊसतोड कामगार, पेन्शन योजनांसह विविध आश्वासने देण्यात आली आहेत. 

भाजपच्या संकल्पाविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुष्काळी भागात पाणी पोहचणार आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्र करणार आहोत. पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, दुष्काळमुक्तीवर संकल्पपत्रात भर दिला आहे. महाराष्ट्राच्या प्रचंड विकासासाठी आम्ही संकल्पपत्रातून संकल्प करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 
 

           

भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक आश्वासने पुढीलप्रमाणे:
 
 
 
> दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्नशील. शाश्वत शेतीवर भर. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन. राज्यभरातील पाण्याची सर्व समस्या दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना. वॉटर ग्रीडची संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदा राबवण्याचे काम करण्यात येईल.
 
 
 
> महाराष्ट्रात लोकसेवा हमी कायदा आणणार
 
 
 
> सरकारी कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना लागू करणार
 
 
 
> सत्तेत आल्यास त्वरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारणार
 
 
 
> ठिंबक सिंचन योजनेसाठी ५० टक्के अनुदान देणार
 
 
 
> राज्यात ऊसतोड कामगार कल्याण योजना आणणार
 
 
 
> महाराष्ट्रात माहिती आणि तंत्रज्ञान उद्योग विकास प्राधिकरणाची स्थापना करणार
 
 
 
> माहेरचा आधार ही पेन्शन योजना
 
 
 
> पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणार
 
 
 
> वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी अन्नदाता आधार योजना
 
 
 
> मराठी शाळांचे आर्थिक सबलीकरण करणार
 
 
 
> वृद्ध श्रमिक पत्रकारांना मासिक १५०० रूपये मानधन
 
 
 
 

बातम्या आणखी आहेत...