आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप अध्यक्ष अमित शहा यांची यूपीतील अलिगड, तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आेडिशातील भवानीपटनात जाहीर सभा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलिगड - भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील अलिगडच्या ब्रिज क्षेत्रातील बूथ अध्यक्षांना संबोधित केले. याप्रसंगी शहा म्हणाले, राममंदिराबाबत भाजपची भूमिका स्पष्ट आहे. सपा, बसप व काँग्रेसने आपली भूमिका मांडली पाहिजे. अयोध्येत राममंदिर हवे की नको हे त्यांनी सांगितले पाहिजे. अयोध्येत राममंदिर आपल्या मूळ स्थानी उभारले जावे, असे भाजपला वाटते. राहुल गांधी आज शेतकरी व शेतीबद्दल बोलू लागले आहेत. मात्र पीक कधी निघते, खरीप काय असते, ते कधी येेते, शेतात बटाट्याचे उत्पादन होते की चिप्सचे, हेदेखील त्यांना ठाऊक नाही, असा टोला शहा यांनी लगावला. 

 

उरीमध्ये सैनिकांनी बलिदान दिले. तेव्हा देश गप्प बसला नाही. पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक केला. कारण देशात मौनी बाबा मनमोहन सिंग यांचे सरकार नाही. उलट मोदी सरकार आहे. संपुआ सरकारच्या काळात घुसखोर देशात येत. ही घुसखोरी खूप वाढली होती. मोदी सरकारने नागरिकत्व विधेयक आणले आहे. घुसखोरांना देशाबाहेर काढले जावे, असा उद्देश आहे. परंतु विरोधी पक्ष त्याच्याविरोधात एकत्र आले. कारण हे घुसखोर या पक्षांची व्होट बँक आहे. 

 

आत्या-भाच्याच्या दुकानाला लावा 'अलिगडचे कुलूप' 
भाजप अध्यक्षांना या निमित्ताने अलिगडचे कुलूप भेट देण्यात आले. आत्या-भाच्याच्या दुकानाला अलिगडचे कुलूप लावण्यात यावे, अशी माझी इच्छा आहे. २०१७ मध्ये यूपी दंगलीत होरपळला होता. तेव्हा पोलिसांना गुंडांची भीती वाटायची. आज गुंड पोलिसांना घाबरतात. सीबीआय प. बंगालच्या पोलिस अधिकाऱ्याची चौकशी करू इच्छिते. त्यात ममता बॅनर्जी यांना का वाईट वाटतेय ? त्यांनी धरणे आंदोलन का केले ? त्यावरून ममता घाबरल्या आहेत, हे स्पष्ट आहे. 'बकरे की माँ कब तक खैर मनाएगी' असे सूचकपणे त्यांनी सांगितले. 

 

राहुल : पटनायक यांचा चिट फंड, मोदींचा नोटबंदी-रफाल घोटाळा 
परिवर्तनासाठी...संवाद साधू 
राहुल गांधी यांनी तेलंगणा पार्टीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. 


वृत्तसंस्था । भुवनेश्वर 
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी आेडिशात होते. भवानीपटनामध्ये त्यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी मोदी सरकार व आेडिशातील नवीन पटनायक सरकारवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी असो की मुख्यमंत्री पटनायक, दोघेही शेतकरी, आदिवासींचा आवाज दडपून टाकत आहेत. ते केवळ १५-२० श्रीमंत मित्रांसाठी सरकार चालवत आहेत. काँग्रेस आदिवासींना त्यांचे अधिकार प्रदान करू इच्छिते. आम्ही जल, जमीन व जंगलातील तुमच्या अधिकारांचे संरक्षण करू. मोदींनी ४ वर्षांत उद्योगपतींना ३.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. परंतु अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरदिवशी केवळ ३.५ रुपये दिले आहेत, असा आरोप राहुल यांनी केला. 

 

राहुल गांधींचा हा पंधरा दिवसांतील दुसरा आेडिशा दौरा आहे. सभेदरम्यान आेडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याविरोधात 'मुर्दाबाद'च्या घोषणा देण्यात येत होत्या. तो धागा पकडून राहुल म्हणाले, मुर्दाबाद आरएसएसचे लोक, भाजपचे लोक म्हणतात. आपण प्रेमाने काम करतो आणि आपण या लोकांना प्रेमाने पराभूत करू. जाेडण्याचे काम करतो. पटनायक यांनी चिटफंड घोटाळा दिला. मोदींनी नोटबंदी, रफाल घोटाळा दिला. आेडिशात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूकही होईल. 

 

छत्तीसगडमध्ये जमीन आदिवासींना परत दिली 
राहुल गांधी म्हणाले, पाच वर्षांत एखादा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याची शक्यता नसल्यास भूसंपादन केलेली जमीन परत केली जाणार आहे. छत्तीसगडमध्ये टाटांचा एक कारखाना पाच वर्षांत होऊ शकला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या सरकारने आदिवासींची जमीन परत केली. आेडिशात काँग्रेस सत्तेवर आल्यास कर्जमाफी, धानास प्रतिक्विंटल २६०० रुपये देण्याचे आश्वासनही आेडिशातील आपल्या दौऱ्यात त्यांनी दिले. 
 

बातम्या आणखी आहेत...