आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP President Amit Shah Nanded Visit Cancel Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमित शहा यांनी नांदेड दौरा अर्धवट सोडला, विमानतळावरुन दिल्लीला परस्पर रवाना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दौरा रद्द झाल्याचा निरोप आला.

नांदेड- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नांदेड दौऱ्यातील कार्यक्रम सोमवारी सकाळी अकस्मात रद्द करण्यात आला. अमित शहा यांचे सकाळी 10 वाजून 45 मिनिटांला हेलिकाँप्टरने विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत त्यांनी नांदेड दौरा रद्द करून ते विमानाने दिल्लीला रवाना झाले.

 

नियोजित कार्यक्रमानुसार अमित शहा सकाळी साडेदहा वाजता सचखंड हुजुुरसाहिब गुरुद्वाराला भेट देणार होते. त्यांच्या दौऱ्याच्या दृष्टीने सकाळपासूनच गुरुद्वारा परिसरात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला. पत्रकारही गुुरुद्वारा गेट क्रमांक 2 वर त्यांची वाट पाहत थांबले होते. तथापि त्यांचा दौरा रद्द झाल्याचा निरोप आला. भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत अमित शहा यांची दुपारी 1 वाजता तातडीची बैठक आहे. त्यामुळे लातूर येथूनच त्यांनी जेवणाचा डबा विमानतळावर पाठवावा, असा निरोप दिला. लातूर आल्यानंतर ते थेट दिल्लीला रवाना झाले. अमित शहांच्या नियोजित दौऱ्यात नांदेडसाठी एक तासाचा कालावधी राखीव होता. परंतु अवघ्या दहा मिनिटांत ते विमानतळावरुन दिल्लीला रवाना झाले.