आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : 'सलग दोन विधानसभा निवडणुकात भाजपने शंभरापेक्षा अधिक जागा स्वबळावर जिंकल्या. महाराष्ट्रात तसे हे कठीणच, पण दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि नाथाभाऊ म्हणजेच एकनाथ खडसे यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीमुळे पक्षाला हे यश मिळाले आहे,' अशी स्तुतिसुमने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी उधळली. 'जळगावात भाजपविराेधात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईही केली जाईल,' असे सांगत पाटील यांनी पक्षावर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंना कुरवाळण्याचा प्रयत्न केला आहे.
रविवारी दुपारी दादर येथील वसंत स्मृती येथे पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षातील संघटनात्मक निवडणुकाबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले की, 'मी कालच नाथाभाऊंना जळगावात भेटलो. सविस्तर चर्चाही झाली. रोहिणी खडसे यांच्या विरोधात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी विरोधात काम केले असल्याचे खडसे यांचे म्हणणे आहे. त्यासंदर्भात पुरावे दिले आहेत. या पुराव्यांचा सध्या मी अभ्यास करत आहे. अद्याप मी कोणत्याही निष्कर्षाप्रत आलेलो नाही. मात्र जर का रोहिणी यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी काम केल्याचे आढळून आल्यास नक्कीच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.'
भूखंड घाेटाळ्यात अडकल्याचे निमित्त करुन गेल्या चार वर्षांपासून खडसे पक्षात अडगळीत पडले अाहेत. अाता भाजप सत्तेवरुन पायउतार झाल्याची संधी साधून नाथाभाऊंनी फडणवीस- चंद्रकांतदादांवर अप्रत्यक्ष ताेफ डागायला सुरुवात केली हाेती. तसेच यापुढे असेच डावलत राहिल्यास मला स्वतंत्र विचार करावा लागेल, असा निर्वाणीचा इशाराही दिला हाेता. या पार्श्वभूमीवर पाटील यांना खडसेंच्या कामाची अाठवण झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा अाहे. तसेच खडसे यांना पक्षात पुन्हा सक्रिय करण्यासाठीही हे प्रयत्न असावेत, असे मानले जाते.
पाच जानेवारीपर्यंत नवा प्रदेशाध्यक्ष निवडणार
1. भाजपने राज्यातील संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. २० डिसेंबरपर्यंत विधानसभा अध्यक्षांच्या, तर २५ डिसेंबरपर्यंत लोकसभा क्षेत्रातील अध्यक्षांच्या निवडणुका.
2. डिसेंबर अखेरपर्यंत भाजपच्या मुंबई अध्यक्षाची निवड तर ५ जानेवारीपर्यंत नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड हाेणार.
3. पुढच्या दोन वर्षांत मुंबई महापालिका स्वबळावर काबीज करण्याचे ध्येय भाजपकडून निश्चित करण्यात आले आहे.
4. भाजपमध्ये दर तीन वर्षांनी बूथस्तर ते केंद्रीय अध्यक्ष अशा निवडणुका होत असतात. महाराष्ट्र आणि हरियाणात निवडणुका लागल्यामुळे येथील पक्षांतर्गत निवडणुकांना विलंब झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.