आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bjp Prez Amit Shah Lashes Opposition Parties For Blaiming Evm Ahead Lok Sabha Election Counting

EVM वर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांवर बरसले भाजप अध्यक्ष; सोशल मीडियावरून मांडली प्रश्नांची मालिका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालांना अवघे काही तास शिल्लक असताना विरोधकांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर भाजपला घेरण्यास सुरुवात केली. या मुद्द्यावर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेससह सर्वच विरोधकांची खरडपट्टी काढली. त्यांनी सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त करताना विरोधी पक्षांच्या हेतूवरच प्रश्न उपस्थित केला. 22 राजकीय पक्ष लोकशाही निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत आहेत. यामुळे केवळ देशातच नव्हे, तर जगभरात लोकशाहीची कुप्रसिद्धी होत आहे. ईव्हीएमवर सवाल उपस्थित करणारे विरोधक केवळ संभ्रम निर्माण करत आहेत. त्या पक्षांना मी काही प्रश्न विचारू इच्छितो असे अमित शहांनी म्हटले आहे.

 

 


सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर प्रश्न उपस्थित करताय का?
अमित शहा यांनी राजकीय पक्षांवर टीका करताना एकूण 6 प्रश्न विचारले आहेत. हे सर्वच प्रश्न एका छापिल फोटो आणि वेगवेगळे करून त्यांनी ट्वीट केले. त्यापैकीच एका प्रश्नात त्यांनी विरोधीपक्षांना सर्वोच्च न्यायालयावर सुद्धा विश्वास नाही का असा सवाल केला. अमित शहा म्हणाले, "देशाच्या सुप्रीम कोर्टाने 3 जनहित याचिकांवर सुनावणी घेत निवडणूक प्रक्रियेला अंतिम स्वरुप दिले. यानंतरच प्रत्येक विधानसभा मतदार संघात 5-5 व्हीव्हीपॅट मोजणी करण्याचे आदेश दिले. मग, काय तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर सुद्धा प्रश्न उपस्थित करत आहात का?"


एक्झिट पोलनंतरच वाढला विरोधी पक्षांचा विरोध!
आणखी एका प्रश्नात अमित शहा म्हणाले, "विरोधी पक्षांनी ईव्हीएमचा मुद्दा मतदानाचे 6 टप्पे संपल्यानंतर काढला आहे. एक्झिट पोल समोर आल्यानंतर त्यांचा विरोध आणखी तीव्र झाला. एक्झिट पोल ईव्हीएमच्या आधारावर नाही तर मतदारांना विचारून केले जातात. अशात एक्झिट पोलच्या बहाण्याने तुम्ही ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न कसे उपस्थित करू शकता?" विशेष म्हणजे, यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा विरोधकांनी ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप केला होता. त्याचवेळी निवडणूक आयोगाने सर्वांना असे करून दाखवण्याचे खुले आव्हान दिले होते. त्यावेळी कुठलाही राजकीय पक्ष कसा समोर आला नाही? याची आठवण सुद्धा शहा यांनी आपल्या प्रश्नांच्या माध्यमातून करून दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...