आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची दिल्ली, कोलकात्यासह अनेक शहरांत काँग्रेसविरोधी निदर्शने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली / कोलकाता - राफेल मुद्द्यावर भाजपने शनिवारी दिल्ली, कोलकात्यासह देशातील अनेक शहरांत काँग्रेस व आम आदमी पार्टीच्या विरोधात निदर्शने केली. भाजप समर्थकांनी काँग्रेस नेते राहुल गांधी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. दोन्ही नेत्यांनी राफेल प्रकरणात मोदींवर अयोग्य आरोप केले होते. त्यामुळेच राहुल व केजरीवाल यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. निदर्शकांनी अनेक ठिकाणी काँग्रेसचे पोस्टर फाडले. राफेल प्रकरणात प्रचारसभांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ‘चौकीदार चोर है’ अशी घोषणा दिली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर राहुल यांनी बिनशर्त माफी मागितली. कोर्टाने त्यांचा माफीचा अर्ज स्वीकारला. परंतु भविष्यात अशी वक्तव्ये करू नयेत, असे न्यायालयाने बजावले. न्यायालयाने फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीच्या प्रकरणात विरोधकांच्या आरोपात मोदी सरकारला क्लीन चिटही दिली आहे. त्यानंतरही भाजपसाठी ही जल्लोषाची वेळ नसून तपास स्वीकारण्याची गरज आहे, असे काँग्रेसने म्हटले होते.