आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसे यांना भाजपने पहिल्या यादीत डावलल्याने भोरगाव लेवा पंचायततर्फे भाजपचा निषेध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर भाजपने मंगळवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. दरम्यान एकनाथ खडसेंना या यादीतून डावलल्याने भोरगाव लेवा पंचायततर्फे भाजपचा निषेध करण्यात आला. दरम्यान एकनाथ खडसेंचा अपमान सहन करणार नाही. त्यांना तिकिट न मिळाल्यास भोरगाव लेवा पंचायत आपली भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याची माहिती कुटुंबप्रमुख रमेश विठू पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 
मंगळवारी भाजपने आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली तर 12 विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. या यादीत एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांचे नाव नव्हते. दरम्यान एकनाथ खडसे यांनी मंगळवारी एक भाजपकडून तर एक अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पहिल्या यादीतून एकनाथ खडसेंचे नाव डावलल्याने भोरगाव लेवा पंचायततर्फे भाचपचा निषेध करण्यात आला आहे.