आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - नोटाबंदीच्या काळात कमावलेल्या पैशातूनच भाजपकडून लोकप्रतिनिधींची खरेदी सुरू असून, गोवा आणि कर्नाटकातील राजीनामानाट्य हे त्याचेच उदाहरण आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी शुक्रवारी भाजपवर निशाणा साधला. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर दिग्विजयसिंह यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते.
सिंह म्हणाले, राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते पदावर कायम राहावेत, अशी सर्वांचीच इच्छा आहे, परंतु ते तयार नाहीत. नेहरू, गांधी परिवारातील कोणीही पक्षाच्या अध्यक्षपदी नसावा, असे त्यांचे म्हणणे आहे. आम्ही त्यांना इतर नेत्याचे नाव सुचवण्यास सांगितले आहे. २०१९ च्या लोकसभेत पीयूष गोयल यांनी ३०३ जागांचा दावा केला होता. जो तंतोतंत खरा ठरला. जिथे सगळ्यात मोठी लोकशाही आहे, अशा देशात त्यांनी इतक्या बारकाईने भविष्यवाणी केली. त्याबद्दल मी गोयल यांचे अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले.
मी अतिरेक्यांसोबत असेन तर अटक का करत नाही
पुण्यात एल्गार परिषदेच्या तपासप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे मिळालेल्या चिठ्ठीत दिग्विजयसिंहांचा मोबाइल क्रमांक होता. याबाबत ते म्हणाले, माझा क्रमांक राज्यसभेच्या संकेतस्थळावर आहे. तो कुणाकडेही असू शकतो. मात्र, मी दहशतवाद्यांना मिळालो आहे, असे पोलिसांना वाटत असेल तर ते मला अटक का करत नाहीत? एकीकडे दहतशवादाविरोधात आवाज उठवायचा आणि दुसरीकडे दहशतवादी कृत्ये करणाऱ्यांनाच उमेदवारी द्यायची आणि कुणी त्याबद्दल विचारले, तर त्याला देशद्रोही ठरवायचे, अशी सध्या स्थिती आहे, असा आरोपही दिग्विजयसिंह यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.