आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा-विधानसभा एकत्र घेण्यास भाजप सज्ज; माजी मंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रितपणे होतील, अशी शक्यता व्यक्त करुन त्या दृष्टीने भाजपची तयारी सुरू आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. मात्र, त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मला आता रुची राहिलेली नाही, अशा शब्दात त्यांनी नाराजी प्रकट केली. पुढील वर्षी लोकसभा निवडणूक एप्रिल-मे महिन्यात तर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. 


राज्य कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने भाजपने गुरुवारी मुंबईत निवडणुकीच्या तयारीचा अाढावा घेतला. बूथ कमिट्यांपासून प्रदेश पातळीपर्यंतच्या विषयात निवडणुका केंद्रस्थानी हाेत्या. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भ्रष्टाचार आणि वादग्रस्त आमदार राम कदम, मधू चव्हाण प्रकरणी मुं्बईत 'दिव्य मराठी'शी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खडसे यांची पाठराखण केली होती. खडसेंनी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही. मात्र, पक्षावर कसलेही बालंट येऊ नये म्हणून त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला.आगामी मंत्रिमंडळ विस्तारात सगळ्यांबरोबर त्यांचाही विचार केला जाईल, असेही दानवे म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर जळगावात शुक्रवारी छेडले असता खडसेंनी नाराजी बोलून दाखवली. 


'भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली अाहे. निवडणूक केव्हाही लागली तरी भाजप त्यासाठी तयार राहणार अाहे. या बैठकीच्या निमित्ताने अापण मुंबईत गेलाे हाेताे. केंद्रीय कार्यकारिणीचा सदस्य असल्याने गेल्या महिन्यात दिल्लीत झालेल्या बैठकीला देखील मी उपस्थित हाेताे. मुंबईत बैठकीत पक्षीय संघटन, निवडणुकीची तयारी या अनुषंगाने चर्चा करण्यात अाली. पक्षाचा नियाेजित कार्यक्रम देण्यात अाला अाहे. त्यानुसार पक्ष संघटनेचे कार्य राज्यभरात सुरू अाहे. लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्रितही लागू शकतात. ती शक्यता नाकारता येत नाही; हे लक्षात घेऊन तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...