आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व बड्यांना तिकिटे, केवळ अडवाणी बाकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर गळ्यात पडले
कानपूरमध्ये वातावरण एकदम वेगळे. तेथे पराभवाची भीती; अखेर जोशी यांना कानपूरचे तिकिट मिळाले. गेल्या निवडणुकीत कसेबसे 17 हजार मतांनी जिंकले. काशीतून ते उतरले असते तर जागा गमवावी लागली असती.

ट्विटरवर संताप
सुषमा स्वराज संतापल्या आहेत. मोदी-राजनाथ मनाला वाटेल तसे निर्णय घेत असल्याने त्या नाराज आहेत. अगोदर बेल्लारीचे कलंकित श्रीरामुलूंना विरोध केला; परंतु पक्षामध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला. तेदेखील रालोआच्या जवळ पोहोचले. आता नाराजी व्यक्त करण्याचे ट्विटर हेच एकमेव साधन राहिले आहे.

मतदारसंघात बदल का?
राजनाथ सिंह. राष्ट्रीय अध्यक्ष. गाझियाबादचे खासदार होते; परंतु या मतदारसंघात आता केजरीवालांचा दबदबा आहे. आता लखनऊमधून लढणार. अटलजी येथून लढत. लखनऊचे खासदार लालजी टंडन यांचे तिकिट कापून आपला मार्ग मोकळा केला. ते अटलजींचा वारसा चालवू इच्छितात.

अद्याप यादीत नाव नाही?
लालकृष्ण अडवाणी. गुजरातचा गांधीनगर हा यांचा मतदारसंघ. पण चौथ्या यादीतही नाव नाही. एकेकाळी मोदीचे गॉडफादर होते, आता सर्वात मोठे विरोधक. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीमुळे मोदी व यांच्यातील दुरावा वाढला. अडवाणींनी गांधीनगरचा हट्ट धरला आहे. पण मोदी तयार नाहीत. पर्याय म्हणून भोपळमधून त्यांच्या नावाची चर्चा आहे.

त्यांना सुरक्षित जागा का?
नरेंद्र मोदी. पंतप्रधानपदाचे दावेदार. प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवणार. वाराणसी मतदारसंघ निवडला आहे. येथून निवडणूक लढवली, तर यूपी-बिहारमध्ये वातावरण होईल, असे पक्षाचे म्हणणे. सिब्बलपासून सुषमांपर्यंत सर्वांचा प्रश्न, ‘ लाट असेल तर सुरक्षित मतदारसंघाचा आग्रह कशासाठी?’

पहिल्यांदाच मैदानात
अरुण जेटली. विद्यार्थी संघटनेव्यतिरिक्त एकही निवडणूक लढवली नाही. आता अमृतसरमधून लढणार. सिद्धू मतदारसंघ सोडण्यास तयार नन्हते. पण गुरुसाठी बलिदान दिले. कारण सिद्धू म्हणतात जेटली त्यांचे गुरू आहेत. प्रत्यक्षात सिद्धी अकाली दलांचे नावडते आहेत. त्यांच्या विरोधात पोस्टरही लावण्यात आले होते.

सुरक्षित की वादग्रस्त जागा?
फैजाबाद- विनय कटियार नाराज झाले आहेत. त्यांच्या मतदारसंघात लल्लू सिंह यांना तिकीट मिळाले आहे.
सर्व मोठ्या नेत्यांना सुरक्षित मतदारसंघांचा शोध सुरू होता. तो पूर्ण झाला.

पाटणा साहिब - भाजपचा दबदबा असलेल्या मतदारसंघाचे शत्रुघ्न सिन्हा खासदार आहेत. गेल्या वेळी त्यांनी शेखर सुमन यांचा पराभव केला होता. या मतदारसंघातून रविशंकर प्रसाद यांची लढण्याची इच्छा होती; परंतु शत्रुघ्न सिन्हा

यांच्यापुढे पक्षाला झुकावे लागले.
चंदिगड- येथील मतदारसंघाला मिळवण्यासाठी भाजपने लोकप्रियतेचे कार्ड वापरले. अभिनेता अनुपम खेर यांची पत्नी किरण खेर यांना उमेदवारी मिळाली. उत्तर प्रदेशात पिता-पुत्रासाठी तिकीट मागणारे कल्याण सिंह यांना मुलाच्या तिकिटावरच समाधान मानावे लागले आहे.

धमकी आणि सल्ला
>मी बोललो, तर अनेक जण उघडे पडतील मी नाराज आहे. मला न विचारता माझा मतदारसंघ बदलला. मी सध्या काही बोलणार नाही. कारण अनेक चेहरे उघडे पडतील.
-गिरिराज सिंह.
(बिहारमधील नवादामधून तिकीट मिळाल्याने नाराज)

किरकोळ मुद्द्यांची राजकीय
>अजेंड्यावर कुरघोडी नको. केंद्रात सत्ता हेच आमचे ध्येय आहे. अशावेळी किरकोळ मुद्द्यांची राजकीय कार्यक्रमावर कुरघोडी होऊ दिली जाऊ नये.
-अरुण जेटली
(नाराज सुषमा स्वराज यांना सल्ला)