आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सिद्धरामेश्वरां\'च्या दरबारात गटबाजी, राजकारणाचे दर्शन; असमान निधी भाजप, शिवसेनेची सिद्धेश्वर मंदिरात आरती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांना शनिवारी आरतीच्या निमित्ताने राजकारण आणि त्यातील गटबाजीचे दर्शन घडले. हद्दवाढ भागाच्या निधीवरून भाजपच्या एका गटाने समर्थनासाठी आरती केली. तर त्याचा सुगावा लागताच शिवसेनेच्या काही नेत्यांनीही थेट मंदिरात येत त्याच्या विरोधात आरती केली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हाती निषेधाचे फलक होते. दोघांनी त्यांच्या विरोधकांना सद््बुद्धी मिळण्यासाठी साकडेही घातले.

 

त्या रकमेतून रस्ते काम करण्यात येणार आहे. हद्दवाढ भागासाठी समान निधीचे वाटप केले नाही. त्यामुळे नीलमनगर परिसरातील नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांच्यासह शिवसेनेने विरोध केला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सुचवलेल्या कामास महापालिका सभागृहात बहुमताने मान्यता देण्यात आली. या निधीतून पाणीपुरवठ्याची कामे करण्यास महापालिका सभागृहाने मान्यता दिली. तसे असताना त्यात परस्पर बदल करत सहकारमंत्री देशमुख यांनी रस्ते कामाची यादी आणली. यात नीलम नगर, आकाशवाणीसह हद्दवाढ भागास समान निधी मिळाला नाही म्हणून शिवसेनेचे नगरसेवक धुत्तरगावकर, विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी विरोध केला होता. सभागृहात प्रस्ताव आला असता, पालकमंत्री गटाने या कामास अप्रत्यक्ष विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण महापौर शोभा बनशेट्टी यांनी या प्रस्तावास हुशारीने मान्यता दिली. 

 

सहकारमंत्र्यांच्या समर्थनात हद्दवाढ भागातील नागरिक व सहकारमंत्री गटाचे नगरसेवक शनिवारी सकाळी महापालिकेत एकत्र आले. आधी विकास मग टॅक्स, सहकारमंत्र्यांचे आभार, हद्दवाढच्या विकासात आड येणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा धिक्कार असो, हद्दवाढ भागात रस्ते झाले पाहिजे आदी घोषणांचे फलक घेऊन सिद्धेश्वर मंदिरात पोहोचले. तेथे महापौर शोभा बनशेट्टी, भाजप शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, नगरसेवक नागेश वल्याळ, संगीता जाधव, राजेश काळे, संतोष भोसले, अश्विनी चव्हाण, रामचंद्र जन्नू, हेमंत पिंगळे आदी उपस्थित होते. महिलांची संख्या जास्त होती. 

 

विकासाच्या आड कोणी येऊ नये 
Ãहद्दवाढ भागात विकास झाला नसताना आत्ता कुठेतरी िवकासाची गती येत असताना त्यास आडकाठी करण्याचा प्रयत्न होत आहे. विकासाला कोणी आड येऊ नये. राजिनामा देण्याची धमकी सुध्दा देऊ नये." राजेश काळे, नगरसेवक त्या रकमेतून रस्ते काम करण्यात येणार आहे. हद्दवाढ भागासाठी समान निधीचे वाटप केले नाही. त्यामुळे नीलमनगर परिसरातील नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांच्यासह शिवसेनेने विरोध केला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सुचवलेल्या कामास महापालिका सभागृहात बहुमताने मान्यता देण्यात आली. या निधीतून पाणीपुरवठ्याची कामे करण्यास महापालिका सभागृहाने मान्यता दिली. तसे असताना त्यात परस्पर बदल करत सहकारमंत्री देशमुख यांनी रस्ते कामाची यादी आणली. यात नीलम नगर, आकाशवाणीसह हद्दवाढ भागास समान निधी मिळाला नाही म्हणून शिवसेनेचे नगरसेवक धुत्तरगावकर, विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी विरोध केला होता. सभागृहात प्रस्ताव आला असता, पालकमंत्री गटाने या कामास अप्रत्यक्ष विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण महापौर शोभा बनशेट्टी यांनी या प्रस्तावास हुशारीने मान्यता दिली. 

 

भाजपच्या आंदोलनाची कुणकुण लागताच शिवसेनेचेही आरती 
भाजप आरती करत असल्याचे कळताच शिवसेनेचे नगरसेवक धुत्तरगावकर, चव्हाण, धाराशिवकर यांच्यासह मोजके कार्यकर्ते मंदिरात आले आणि त्यांनीही आरती केली. निधीचे समान वाटप केले नाही. ठरावीक भागासाठी निधी पळवला. हद्दवाढ भागाचा समान विकास करण्याऐवजी राजकारण केले जात असल्याचे मत शिवसेनेने व्यक्त केले. निधीची पळवीपळवी असे फलक त्यांनी झळकावले. मंदिरात घोषणाबाजी केली. 'पहिले मंदिर फिर सरकार', 'भंपक नको विकास हवा', आदी घोषणा दिल्या. भाजप एकीकडे महाआरती करत असताना त्याचवेळी शिवसेनेच्या वतीने मंदिरात आरती करण्यात आली. 

 

... आणि महिला नागरिकांनी 'पक्ष' बदलला 
नीलमनगर परिसरातील प्रभाग क्रमांक १९ मधील काही महिला महापालिका ते मंदिरपर्यंत पदयात्रेत भाजपसोबत होत्या. त्या भाजपचे नगरसेवक श्रीनिवास करली यांच्यासोबत आल्या होत्या. मंदिरात आल्यावर त्यांना त्यांच्याच प्रभागातील नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर दिसले. आमचे प्रभागात काम करणारे नगरसेवक इथे आहेत, असे म्हणत त्या महिला धुत्तरगावकर यांच्यासोबत जात भाजपच्या विरोधी आंदोलनात सहभागी झाल्या हे विशेष. 

 

बातम्या आणखी आहेत...