आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना आणि भाजप एकत्रित येऊनच सत्ता स्थापित करणार, राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या बाकावर -सूत्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / नवी दिल्ली - राज्यात सत्ता स्थापनेला विलंब होत असताना दिल्लीतही यावरून राजकीय वातावारण तापले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी सोमवारी दिल्लीत पोहोचले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शहांची भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभा निवणडूक एकत्रित लढणाऱ्या शिवसेना आणि भाजपचे मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू आहे. अशात भाजपने एकटेच आणि शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापनेचा इशारा दिला आहे. तरीही हे दोन्ही पक्ष एकत्रित येणार आणि महायुतीचीच सत्ता स्थापित होणार असे सोमवारी सुत्रांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या जवळच्या एका सुत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे, "शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या जे काही होत आहे, ते निव्वळ दबावाचे तंत्र आहे. निवडणूक होण्यापूर्वीपासून दोन्ही पक्ष एकत्रित आहेत. आणि सत्ता देखील दोघे मिळूनच स्थापित करणार आहेत. राष्ट्रवादीबद्दल बोलावयाचे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, आम्ही केवळ 'वेट अॅण्ड वॉच'ची भूमिका घेऊन सरकार स्थापनेची वाट पाहणार आहोत."

निवडणुकीच्या वेळी सत्तेचे समान वाटप (मुख्यमंत्री पदावरही) होणार असे आश्वासन भाजपकडून मिळाल्याचा दावा शिवसेनेने केला. परंतु, भाजप मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार नाही. या पदावर पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच राहतील असे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, शिवसेनेचा अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव कितपत यशस्वी होतो हे तुर्तास सांगता येणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 288 पैकी 105 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. तर शिवसेनेकडे 56 जागा आहेत. तरीही शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपला सत्ता स्थापित करता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...