Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | BJP-Shiv Sena's '25 -23' formula; Final phase of the alliance; Ministers' claim

भाजप, सेनेत '25-23'चे सूत्र; मित्रपक्षांना ज्याचे त्याने द्यायचे..युती अंतिम टप्प्यात; मंत्र्यांचा दावा 

रमाकांत दाणी | Update - Feb 14, 2019, 08:03 AM IST

युती व्हावी यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही आपण युतीसाठी सकारात्मक असल्याचे सांगितले.

  • BJP-Shiv Sena's '25 -23' formula; Final phase of the alliance; Ministers' claim

    नागपूर- लोकसभेसाठी भाजप-शिवसेना युती होणार की नाही, या चर्चेला पूर्णविराम मिळू शकतो. भाजपने लोकसभेच्या २५ व शिवसेनेने २३ जागा लढवाव्यात यावर उभय पक्षांत मतैक्य होण्याचे संकेत असून भाजपच्या कोअर ग्रुपमधील एका मंत्र्याने शंभर टक्के युती होणार असल्याचे संकेत दिले. मनसे राष्ट्रवादीच्या महाआघाडीत सामील होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजप नेत्यांवर तोंडसुख घेणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेत बदल होण्याचे संकेत आहेत. शिवसेना नेतृत्व या मन:स्थितीत असल्याचा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने केला.

    दरम्यान, युती व्हावी यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही आपण युतीसाठी सकारात्मक असल्याचे सांगितले. तर, सा. बां. मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगून युतीचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार असल्याचे स्पष्ट केले. भाजपने २०१४ मध्ये लढलेली एक जागा शिवसेनेला द्यावी लागेल. त्यात नांदेड, माढा किंवा बारामती यापैकी १ जागा असू शकेल. गेल्या वेळी भाजपने २६ व सेनेने २२ जागा लढवल्या होत्या.

    मित्रपक्षांना ज्याचे त्याने द्यायचे...
    युतीमधील मित्रपक्षांना जागा देण्याविषयी या मंत्र्यांनी सांगितले की, मित्रपक्ष ज्याच्याकडे राहतील, त्या पक्षाने त्यांच्या जागा सोडाव्यात, असा तोडगा निघण्याच्या मार्गावर आहे. या वाटाघाटींमध्ये मित्रपक्षांची अडचण नाहीच, असा दावाही मंत्र्यांनी केला.

Trending