सोशल मीडियाच्या वापरात भाजप-शिवसेना आघाडीवर; जाणून घ्या कोणत्या पक्षाच्या किती पोस्टस्

दिव्य मराठी

Apr 24,2019 09:07:00 AM IST

मुंबई - जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी वॉर रूम उभारल्या असून त्या माध्यमातून सोशल मीडियावर पक्षाचा प्रचार केला जात आहे. अनेक नेतेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे सांगितले जाते. परंतु राज्यातील सर्व प्रमुख पक्षांच्या सोशल मीडिया अकाउंटडे पाहिले असता पहिल्या क्रमांकावर भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असल्याचे दिसते. १० ते २० एप्रिलपर्यंतच्या सोशल पोस्टचा यात समावेश आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तर सहा एप्रिलनंतर एकही ट्विट केलेले नाही.

सोशल मीडियावर कुणाचा बोलबाला

> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा दिवसांत 202 ट्विट्स केले आहेत. त्यांनी ट्विटरवर दररोज सरासरी
20 ट्विट्स केले आहेत.

> सुप्रिया सुळेंनी दहा दिवसांत 20 ट्विटस केले आहेत.
> मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी १० ते २० एप्रिलदरम्यान 05 ट्विट्स केले.
> काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी.10 ट्विट्स केले आहेत.
> युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी १० दिवसांत 09 ट्विट्स केले आहेत.

कोणत्या पक्षाच्या किती पोस्ट्स
>
भाजप : १० एप्रिलपासून १५४ ट्विट्स करण्यात आले. यात रिट्विट्सचा समावेश नाही. दिवसाला सरासरी १७ ट्विट्स आहेत.

> शिवसेना : दहा दिवसांत ८० ट्विट्स म्हणजेच दिवसाला सरासरी ८ ट्विट केले.

> मनसे : अधिकृत हँडलवरून १० एप्रिलपासून १६६ ट्विट झाले असून सरासरी दररोज ट्विटची संख्या १६.६ होते. राज ठाकरे यांनी दहा दिवसांत फक्त सहा ट्विट केले आहेत.

> राष्ट्रवादी : अधिकृत ट्विटर अकाउंटवरून १० ते २० एप्रिलदरम्यान १२७ ट्विट केले असून दररोज सरासरी १२.७ ट्विट होतात.

> काँग्रेस : अधिकृत ट्विटर अकाउंटवरून १० एप्रिलपासून फक्त २५ पोस्ट टाकल्या आहेत.

मुख्यमंत्री सक्रिय
मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील सभांच्या माहितीबरोबरच विविध वाहिन्यांवरील मुलाखती ट्विट केल्या. आंबेडकर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती, जोतिबा फुले जयंतीनिमित्त व मतदान करा म्हणून ट्विट केले आहे. मुख्यमंत्र्यांचे सीएमओ महाराष्ट्र या नावानेही एक ट्विटर अकाउंट असून त्यावर ७ एप्रिलनंतर एकही ट्विट टाकलेले नाही.

जयंत्या, सणांचे ट्विट्सही
> सुप्रिया सुळे :
आंबेडकर जयंती व गुड फ्रायडेच्या शुभेच्छा देणारे ट्विट केले आहे.

> अशोक चव्हाण : सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे ट्विट केले असून राहुल गांंधींचे ट्विट रिट्विट केले.

> राज ठाकरे : भाषणाचे यूट्यूबवरील तुकडे, डॉ. आंबेडकर जयंती व रामनवमीच्या शुभेच्छा देणारे ट्विट केले आहे.

>अशोक चव्हाण : हनुमान जयंती, डॉ. आंबेडकर जयंती, रामनवमी, जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ट्विट केलेले आहे.

>आदित्य ठाकरे : शिवसेनेच्या ट्विटर अकाउंटवरील काही ट्विट आणि शिवसेनेच्या काही उमेदवारांचे ट्विट रिट्विट केले आहे.

X