Home | National | Other State | BJP shocks Karnataka, JD win 4 seats in karnataka Byelection

कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, काँग्रेस-जदयूला 4 जागी यश

वृत्तसंस्था | Update - Nov 07, 2018, 09:10 AM IST

माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष येदियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र यांनी शिमोगामध्ये विजय मिळवला.

 • BJP shocks Karnataka, JD win 4 seats in karnataka Byelection

  बंगळुरू - कर्नाटकमध्ये लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) युतीने चार जागा जिंकत भाजपला जोरदार धक्का दिला. काँग्रेस-जद युतीने बेल्लारी आणि मांड्या लोकसभा जागेसह विधानसेच्या जमखंडी व रामनगरम जागा जिंकल्या. तर, भाजपने आपला पारंपरिक गड मानल्या जाणाऱ्या शिमोगा लोकसभा मतदारसंघात जागा कायम राखली.


  माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष येदियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र यांनी शिमोगामध्ये विजय मिळवला. हा भाजपचा पारंपरिक गड मानला जातो. तर, रामनगरम विधानसभा जागेवर मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी विजयी झाल्या.

  लोकसभाही एकत्र लढवणार
  पोटनिवडणुकीत काँग्रेस-जद युतीला मिळालेला विजय पाहता आगामी लोकसभा निवडणूक एकत्रित लढवण्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडू यांनी केली.


  ही तर २०१९ची झलक
  हे निकाल म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीची झलक असल्याचे काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. तर, मतदारांचा हा कल म्हणजे देशातील आगामी काळात होणाऱ्या बदलाचे मोठे संकेत असल्याचे काँग्रेस नेते मनीष तिवारी म्हणाले.

  पुढील स्लाईडवर पहा, मतदारांची आकडेवारी.....

 • BJP shocks Karnataka, JD win 4 seats in karnataka Byelection
 • BJP shocks Karnataka, JD win 4 seats in karnataka Byelection

Trending