आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधी पक्षनेतेपद देऊन माझ्यावर झालेला अन्याय भाजपने दूर करावा, आमदार विनायक मेटंची पत्रकार परिषदेत मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठा समाजाच्या सवलतींवर सरकारचा अंकुश

पुणे- 'सत्तेत बसता बसता अनाकलनीय राजकीय घडामोडींमुळे आमच्यावर विरोधात बसण्याची वेळ आली. मात्र, तरीही भाजपची साथ आम्ही सोडणार नाही. सत्तेत असताना भाजपने मंत्रिपद दिले नाही, आमच्या पक्षावर अन्याय झाला. किमान आता तरी भाजपने विधान परिषदेतील ज्येष्ठ सदस्य म्हणून माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवून अन्याय दूर करावा,' अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी मंगळवारी मांडली.
शिवसंग्राम पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात झाली, त्यानंतर मेटेंनी पत्रकारांशी संवाद साधला. 'भाजपमध्ये अोबीसींवर अन्याय होत असल्याचा आरोप चुकीचा आहे. या पक्षात ३८ आमदार हे अोबीसी आहेत,' असे त्यांनी स्पष्ट केले. पंकजा मुंडेंच्या पराभवाबाबत मात्र भाष्य करणे मेटेंनी टाळले.'महाविकास आघाडीत अंतर्गत वाद सुरू आहेत. म्हणून मंत्र्यांचे खातेवाटप अद्याप झालेले नाही. त्यामुळे राज्याचा विकास करण्याएेवजी 'बैठका घ्या अन‌् स्थगिती द्या' एवढेच काम हे सरकार करू लागले आहे, असे चित्र सध्या दिसत आहे. या सर्व प्रकारामध्ये राज्यातील जनता वेठीस धरली जात असल्याचेही ते म्हणाले.

मराठा समाजाच्या सवलतींवर सरकारचा अंकुश
 
महायुती सरकारने मराठा समाजासाठी अनेक सोयी- सवलती दिल्या. मात्र, महाविकास आघाडीच्या सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक तथा इतर सवलती देणाऱ्या 'सारथी' संस्थेचे आर्थिक अधिकार काढून घेतले आहेत. 'सारथी'ला पूर्वीसारखे अधिकार न दिल्यास हे सरकार मराठा समाजाविरोधात भूमिका घेत असल्याचा संदेश जाईल, असे आमदार मेटे म्हणाले.