Home | National | Other State | BJP supporter man shoots his brother for voting for congress

काँग्रेसला मतदान केल्याच्या रागातून भावाने झाडली भावावर गोळी

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 15, 2019, 04:54 PM IST

मतदानाच्या दिवशी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावरून रस्सीखेच चालू होती

  • BJP supporter man shoots his brother for voting for congress

    चंदीगड(हरियाणा)- हरियाणातील झज्जर जिल्ह्यात भाजप समर्थकाने काँग्रेसला मतदान केल्यामुळे आपल्याच चुलत भावावर गोळी झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या गोळीबारात राजा नावाचा तरूण आणि त्याची आई जखमी झाले आहेत. धर्मेंद्र असे गोळी झाडणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तो सध्या फरार झाला आहे.

    झज्जरमधील सिताना गावात मतदानाच्या दिवशी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावरून रस्सीखेच चालू होती. जघमी राजाला आरोपी धर्मेंद्रने भाजपला मतदान करण्याचे सांगितले होते. पण राजाने भाजपला मतदान करण्यास नकार दिल्याने धर्मेंद्रला राग आला. हाच राग मनात धरून सोमवारी सकाळी धर्मेंद्रने राजाच्या घरी जाऊन त्याच्यावर गळी झाडली, यावेळी राजाच्या आईलाही किरकोळ दुखापत झाली.

    या गोळीबारात राजा गंभीर जखमी झाला असून, त्याला जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या आईची प्रकृती सध्या स्थिर असून दोघांनाही निगराणीसाठी रूग्णालयातच ठेवण्यात आले आहे. दरम्यान ज्या बंदुकीतून गोळी झाडली, ती बंदूक अवैध असल्याची माहिती तपास करत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. सध्या आरोपी धर्मेंद्र फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Trending